वर्ध्यात लक्षणे नसलेले कोरोना रुग्ण सर्वाधिक; आयसीयुतील रुग्ण खाटा फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 07:00 AM2020-09-15T07:00:00+5:302020-09-15T07:00:09+5:30

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे.

Most of the asymptomatic corona patients in Wardha; The patient in the ICU is bedridden | वर्ध्यात लक्षणे नसलेले कोरोना रुग्ण सर्वाधिक; आयसीयुतील रुग्ण खाटा फुल्ल

वर्ध्यात लक्षणे नसलेले कोरोना रुग्ण सर्वाधिक; आयसीयुतील रुग्ण खाटा फुल्ल

Next
ठळक मुद्दे४०० कोविड बाधितांवर दोन कोरोना रुग्णालयांमध्ये होताहेत उपचार

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. अशातच वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे. सध्यास्थितीत या दोन्ही कोविड रुग्णालात एकूण ४०० कोरोना बाधित उपचार घेत असून यात निम्म्या पेक्षा अधिक रुग्ण लक्षणविरहित आहेत. असे असले तरी झपाट्याने कोरोना वाढत असल्याने वर्धेकरांनीही आता गाफिल न राहता दक्ष राहून स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

प्राप्त माहितीनुसार, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात सध्या २१२ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २७ रुग्ण गंभीर असून २२ रुग्णांमध्ये कोरोनाची किरकोळ लक्षणे आहेत. तर १६८ कोविड बाधित लक्षणविरहित असल्याचे सांगण्यात आले. तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात सध्यास्थितीत १८८ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३८ रुग्ण गंभीर असून १९ कोरोना बाधितांना किरकोळ लक्षणे आहेत. तसेच १३१ कोविड बाधित लक्षणविरहित आहेत.

या सर्व कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी वर्धेकरांनी कोरोना संकटात आपली जबाबदारी वेळीच ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करणे ही काळाची गरज ठरू पाहत आहे.

लक्षणविरहीत रुग्णांमुळे डॉक्टरांवर वाढला ताण
अ‍ॅक्टिव्ह कोविड बाधितांपैकी निम्म्यापेक्षा जास्त कोविड बाधित लक्षणविरहित आहेत. अशा लक्षणविरहित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. पण त्या निर्णयावर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सध्या कोविड योद्धा म्हणून काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांवर गंभीर व किरकोळ कोविड बाधित रुग्णांवर उपचार करताना कामाचा मोठा ताण येत असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये रुग्णखाटांचा तुटवडा आहे ही बाब खरी आहे. असे असले तरी जिल्ह्याची कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात आहे. वर्धेकरांनी गाफिल राहिल्यास कोरोनाचा प्रसार आणखी झपाट्याने होईल. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.
- डॉ. अनुपम हिवलेकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

Web Title: Most of the asymptomatic corona patients in Wardha; The patient in the ICU is bedridden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.