हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:12+5:30

जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.

A march was organized by students of Hindi University | हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

Next
ठळक मुद्देजेएनयुमधील हल्ल्याचा निषेध : कठोर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जेएनयूमधील विद्यार्थी आणि संशोधकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ३५ पेक्षा जास्त विद्यार्थी व संशोधनकर्ते जखमी झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि जेएनयुमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ येथील हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करीत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ गांधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि हिंदी विद्यापीठाच्या संशोधकांनी हिंदी विश्व विद्यापीठाच्या मुख्यव्दारापर्यंत मोर्चा काढला. या दरम्यान उपस्थितांनी केंद्र सरकार शैक्षणिक संस्था उद्धवस्त करुन खाजगीकरणावर जोर देत आहे. जामिया मिलिया, एएमयू आणि जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर हल्ले करुन बदनामी करण्याचा प्रयत्न बऱ्याच काळापासून चालू आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे चंदन सरोज, रविचंद्र, अजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार इस्तेखार अहमद यांनी मानले. या मोर्चादरम्यान विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व संशोधनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये विश्व हिंदी विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधनकर्ते मोठ्या संख्येने सहभगी होते. या मोर्चादरम्यान हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन त्याव्दारे या घटनेचा निषेध केला. व हल्लेखोरांवर कारवार्इंची मागणी केली.

सेवाग्राम आश्रमाबाहेर सर्व सेवा संघ करणार ३० ला सत्याग्रह
सेवाग्राम- जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात ५ जानेवारीला शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ५० जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा आय.सी.घोष गंभीर जखमी झाल्या. हल्लेखोर लाठी,रॉड घेऊन विद्यापीठ परिसरात शिरले त्यांनी तीन तास गोंधळ घातला. याची माहिती पोलिसांना दिल्यावरही पोलीस वेळेवर पोहोचली नसल्याने यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या घटनेचा निषेध म्हणून अखिल भारतीय सर्व सेवा संघांचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी महात्मा गांधीजींच्या शहिद दिनी ३० जानेवारीला सेवाग्राम आश्रम समोर उपवास सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केले आहे. हल्याच्या अगोदर व्हॉट्स अ‍ॅपवरील मेसेज मध्ये वी.सी.आपला माणूस असल्याचे म्हटले. यावरून हल्ला सुनियोजित असल्याचे स्पष्ट होते. ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मान्य नाही, अशांचा या हल्ल्यात हात आहे. या लोकांची कार्यपद्धती फासिवाद आहे. यातून अनेकांना हिटलर व मुसोलिनी पासून प्रेरणा मिळते. अशाच विचांराच्या लोकांनी गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली.गांधी विचार यामुळे संपेल असा समज होता. पण गांधी विचार मात्र सर्वत्र पसरत असल्याचे सांगून हिंसाचाराचा तेच आश्रय घेतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. या हिंसाचारात तेच लोकं सहभागी आहेत असेही विद्रोही यांनी पत्रकातून म्हटले आहे. सर्व सेवा संघाने या घटनेचा विरोध, नागरिकता संशोधन, एन.आर.सी.आणि एन.पी.आर.चा विरोध करण्यासाठी बापूंच्या बलिदानदिनी सकाळपासून सायंकाळी ५.१७ वाजतापर्यंत उपवास करणार आहे. त्यानंतर सर्व धर्म प्रार्थनेने या सत्याग्रहाचा समारोप होणार आहे.

Web Title: A march was organized by students of Hindi University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.