Maharashtra Election 2019 ; आज प्रचारतोफा थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच वर्ध्यात सर्वच पक्षांनी प्रचारांचा धुराळा उडवून दिला आहे. नामांकन दाखल ...

Maharashtra Election 2019 ; Today it will cool down | Maharashtra Election 2019 ; आज प्रचारतोफा थंडावणार

Maharashtra Election 2019 ; आज प्रचारतोफा थंडावणार

Next
ठळक मुद्देउमेदवारांची प्रचारासाठी धावपळ : प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच वर्ध्यात सर्वच पक्षांनी प्रचारांचा धुराळा उडवून दिला आहे. नामांकन दाखल केल्यानंतर प्रचाराकरिता बारा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. सोमवारी मतदान होणार असल्याने ४८ तास आधी म्हणजेच शनिवारी हा कालावधी संपणार आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या उमदेवारांकडून शेवटच्या दिवशीच्या शक्तिपदर्शनासह जाहीर सभेचे नियोजन करण्याची धावपळ चालली आहे.
निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीसाठी २१ सप्टेंबर रोजी घोषणा झाली. २७ सप्टेंबरपासून अधिसूचना प्रसिद्ध होऊन उमेदवारी दाखल करण्यात प्रारंभ झाला होता. ७ ऑक्टोंबर ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती. जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत चालला. यातही काहींनी बंडखोरी करीत पक्षाच्या उमेदवारीची डोकेदुखी वाढविली आहे. जिल्ह्यातील चारही मतदार संघातून ४७ उमेदवार रिंगणात आहे. त्यामध्ये आर्वी व वर्धा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १० तर हिंगणघाटमध्ये १३ आणि सर्वाधिक देवळी मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात आहे. या उमदेवारांना प्रचारासाठी मिळालेल्या कालावधीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या जाहीरसभा, सोशल मिडीया, प्रचार रॅली, मोटर सायकल रॅली आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. शहरातसह गावातही राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहावयास मिळत आहे.
आता मतदानाची तारीख तीन दिवसावर आल्याने मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजे शनिवार १९ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची मुदत संपत आहे. त्यामुळे उरलेल्या वेळात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे.

चारही मतदारसंघात १ हजार ३१६ मतदान केंद्र
प्रशासकीय पातळीवरही धावपळ सुरू असून मतदानासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदानयंत्रांची चाचणी घेऊन ते सील करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील चारही मतदार सघांत १ हजार ३१६ मतदान केंद्रावरुन मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी ५ हजारावर अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहे. मतदानाकरिता कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटसह व्हिव्हिपॅटही सज्ज आहे. २० रोजी मतदान कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Today it will cool down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा