Maharashtra Election 2019 ; देशात पाच वर्षांतच सर्वाधिक बेरोजगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:21+5:30

विदर्भातील उद्योग धंदेही बंद पडत असून बेरोजगाराची समस्या वाढत आहे. राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, सरकारला त्याचे सुतक नाही, असा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. आपण काँग्रेसला साथ दिल्यास लोअर वर्धा प्रकल्प मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.

Maharashtra Election 2019 ; The highest unemployment in five years in the country | Maharashtra Election 2019 ; देशात पाच वर्षांतच सर्वाधिक बेरोजगारी

Maharashtra Election 2019 ; देशात पाच वर्षांतच सर्वाधिक बेरोजगारी

Next
ठळक मुद्देआर्वीच्या सभेत राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका : काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : काँग्रेस सत्तेत असताना गरिबांच्या खिशात पैसा पोहोचविण्याचे उदार धोरण अवलंबिले होते. नरेंद्र मोदींचे भाजप सरकार सत्तेत येताच त्यांनी गरिबांना थेट लाभ मिळवून देणारी मनरेगा योजना, जमीन अधिग्रहण कायदा, नोटबंदीसारखे कठोर निर्णय घेऊन देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. त्यामुळे आलेल्या मंदीच्या सावटाने देशात चाळीस वर्षांतील बेरोजगारीपेक्षा जास्त बेरोजगारी या पाच वर्षांत वाढली आहे, अशी टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले.
आर्वी विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टिकास्त्र सोडले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विजय वडेट्टीवार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, प्रदेश काँग्रेसचे सभा समन्वयक रवींद्र दरेकर, जिया पटेल, अमर काळे, शेखर शेंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची उपस्थिती होती. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने समाजातील सर्व घटकांची फसवणूक केली आहे. सरकारला या निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी करीत भाजपने शेतकऱ्याचे पीक विम्याचे ११०० हजार कोटी खासगी कंपन्यांना वाटले. शेतकरी कर्जमाफीची भाषा अजूनही सुरूच असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वाटोळे केले, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील ५२ टक्के एमआयडीसी आर्थिक मंदीमुळे बंद पडल्या. विदर्भातील उद्योग धंदेही बंद पडत असून बेरोजगाराची समस्या वाढत आहे. राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, सरकारला त्याचे सुतक नाही, असा आरोप यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केला. आपण काँग्रेसला साथ दिल्यास लोअर वर्धा प्रकल्प मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले. चारशे रुपयांत मिळणारे सिलिंडर भाजप सरकारच्या काळात सातशे रुपयांवर पोहोचले. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आणि शेतकऱ्यांचा पैसा हडप करून विमा कंपन्यांचे घर भरल्याने राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, असा घणाघात काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांनी केला. या कार्यक्रमाचे संचालन रियाज अन्सारी यांनी केले. सभेला आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

राहुल गांधींच्या सभेला रणजित कांबळेंची दांडी
वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी व वर्धा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आर्वी येथे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात होत असलेल्या या राष्ट्रीय नेत्याच्या सभेला देवळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजित कांबळे यांनी दांडी मारली. या त्यांच्या अनुपस्थितीती चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. रणजित कांबळे राष्ट्रीय नेत्याच्या सभेला गैरहजर राहिले. उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यांच्या भगिनी अ‍ॅड. चारूलता राव टोकस या राहुल गांधी यांच्या सभेला आवर्जून उपस्थित होत्या.

Web Title: Maharashtra Election 2019 ; The highest unemployment in five years in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.