Maharashtra Election 2019 ; विकासाचा आलेख उंचावण्याकरिता संधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:15+5:30

वर्धा विधानसभा क्षेत्रातील वर्धा आणि सेलू तालुक्यात मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे शहरी व ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ शनिवारी झालेल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ.पंकज भोयर यांच्या नेतृत्वात मागील पाच वर्षांत विकासाला चालना दिली आहे.

Maharashtra Election 2019 ; Give opportunities for a development graph to emerge | Maharashtra Election 2019 ; विकासाचा आलेख उंचावण्याकरिता संधी द्या

Maharashtra Election 2019 ; विकासाचा आलेख उंचावण्याकरिता संधी द्या

Next
ठळक मुद्देनगराध्यक्षांचे आवाहन : पंकज भोयर यांची शहरात प्रचार रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा विधानसभा मतदार संघातील वर्धा व सेलू तालुक्याच्या विकासाकरिता सदोदित प्रयत्नरत असलेले भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांना पुन्हा एकदा संधी देऊन विधानसभेत पाठवा, असे आवाहन नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वात शहरातून निघालेल्या पदयात्रेत डॉ. पंकज भोयर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वर्धा विधानसभा क्षेत्रातील वर्धा आणि सेलू तालुक्यात मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे शहरी व ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ शनिवारी झालेल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ.पंकज भोयर यांच्या नेतृत्वात मागील पाच वर्षांत विकासाला चालना दिली आहे. विकासाचे नवे मॉडेल त्यांनी महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या कर्मभूमीत उभे केले आहे. त्यामुळे विकासकामांचा हा क्रम कायम ठेवण्याकरिता त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यामुळेच कार्यकर्ते व भाजपचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहे. रविवारी प्रभाग क्रमांक ६ व १२ मध्ये रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅली दरम्यान मतदारांनी डॉ. भोयर यांना आशीर्वाद दिले.
मुस्लिम समाजाच्यावतीने डॉ. पंकज भोयर यांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. या पदयात्रेत भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, नगरसेवक नौशाद शेख, नीलेश किटे, रेणुका आडे, विजय उईके, पवन राऊत, अभिषेक त्रिवेदी, शरद आडे, बंटी वैद्य, कैलास राखडे, संजय बघेल, डॉ. सुनील चावरे, वंदना भुते, प्रदीप तलमले, इंदू तलमले, वरुण पाठक, मन्ना पठाण, अब्बास अली, राजेश पेंदोर, शेख नईम, रवी खिराळे, नावेद अली, जावेद शेख, राजू सोनी, सागर पाखडे, अमित भोसले, केतन नानोटे, मिलिंद असरेकर, सुभाष धामोने, कुणाल मोरे यांच्यासह भाजप-शिवसेना व रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Give opportunities for a development graph to emerge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा