Maharashtra Election 2019 ; विकासाची ज्योत कायम ठेवण्यासाठी बहुमत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:26+5:30

भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ सेलू तालुक्यात भाजप-सेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेलू शहरासह ग्रामीण भागात पदयात्रा काढण्यात येत असून नागरिकही सहभागी होत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत सेलू शहर व ग्रामीण भागात विकासाची अनेक कामे करण्यात आली.

Maharashtra Election 2019 ; Give a majority to maintain the flame of development | Maharashtra Election 2019 ; विकासाची ज्योत कायम ठेवण्यासाठी बहुमत द्या

Maharashtra Election 2019 ; विकासाची ज्योत कायम ठेवण्यासाठी बहुमत द्या

Next
ठळक मुद्देदेवतारे : भोयर यांच्या प्रचारदौऱ्यात आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : भाजप-सेना सरकारच्या कार्यकाळात सेलू परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्यामुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. विकासाची ही ज्योत अशीच कायम तेवत ठेवण्याकरिता पुन्हा भाजपला बहुमत द्या, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी सेलूतील प्रचार दौºयादरम्यान केले.
भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ सेलू तालुक्यात भाजप-सेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेलू शहरासह ग्रामीण भागात पदयात्रा काढण्यात येत असून नागरिकही सहभागी होत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत सेलू शहर व ग्रामीण भागात विकासाची अनेक कामे करण्यात आली. डॉ. पंकज भोयर यांनी विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणला. सेलू येथील बस स्थानक, टी-पॉर्इंट ते बसस्थानक सिमेंट मार्ग, सेलू शहरातील अंतर्गत रस्ते व अन्य विकासकामे त्यांच्या कालावधीत झाली. प्रत्येक गावाला ‘समान निधी, समान विकास’ या धोरणानुसार निधी देण्यात आला. रस्ते, स्मशानभूमी, महिला बचतगट भवन यासारखी अनेक कामे त्यांनी केल्याची माहिती कार्यकर्ते घराघरात पोहोचवित आहे. प्रथमच सेलू तालुक्याला विकासासाठी मोठा निधी भोयर यांच्या प्रयत्नामुळे मिळाल्याने त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवावे, असे आवाहन प्रचारादरम्यान कार्यकर्ते करीत आहे. या पदयात्रेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांच्यासह जिल्हा संघटक रविकांत बालपांडे, भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, सेलू शहराध्यक्ष शब्बीर अली सय्यद, समाजकल्याण सभापती सोनाली कलोडे, पंचायत समिती सभापती जयश्री खोडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद लाखे, पंचायत समिती सदस्य अशोक मुडे, बंडू गव्हाळे, योगेश रणनवरे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरीश पारिसे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पारिसे, नगरसेवक चुडामण हांडे, अ‍ॅड. शीतल भोयर, मनोहर सोमनाथे, हिरामण हांडे, जावेद, चंद्रशेखर वंजारी, गुरू खोडके, विलास वरटकर, अशोक रतनवार, विजय खोडे, अनिल तेलरांधे, अभय ढोकणे, मुनेश्वर, पोहणे, भूषण पारटकर, अरुण तडस, विकास मोटमवार यांच्यासह भाजप-सेना व रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Give a majority to maintain the flame of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा