लोकमत ऑनलाईन इफेक्ट; वर्धा जिल्ह्यातील तलावांची तपासणी सुरू; पावसाने गेले तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:59 PM2019-09-07T12:59:47+5:302019-09-07T13:01:10+5:30

वर्धा जिल्ह्यातील तलावाला तडे गेल्याचे वृत्त लोकमतने ऑनलाईनवर प्रकाशित करताच, ते जलद गतीने वर्धा शहरात व्हायरल झाले. ही बातमी अधिकाऱ्यांपर्यंतही गेली. त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तलावाच्या काठी धाव घेतली असून तलावाची तपासणी सुरू केली आहे.

Lokmat online effect; Inspection of lakes in Wardha district; It was raining | लोकमत ऑनलाईन इफेक्ट; वर्धा जिल्ह्यातील तलावांची तपासणी सुरू; पावसाने गेले तडे

लोकमत ऑनलाईन इफेक्ट; वर्धा जिल्ह्यातील तलावांची तपासणी सुरू; पावसाने गेले तडे

Next
ठळक मुद्देकार्यकारी अभियंते पोहचले घटनास्थळी

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील रसुलाबाद येथील तलावाची तपासणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंते व अन्य चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी या तलावांना तडे गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते.
रसुलाबादजवळच्या कुऱ्हा तलावाच्या भिंतींना तडे गेल्याने तलावाच्या पायथ़्याशी असलेल्या कोलामांच्या वस्तीत दहशतीचे वातावरण आहे. येथील नागरिकांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे.
तलावाला तडे गेल्याचे वृत्त लोकमतने ऑनलाईनवर प्रकाशित करताच, ते जलद गतीने वर्धा शहरात व्हायरल झाले. ही बातमी अधिकाऱ्यांपर्यंतही गेली. त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तलावाच्या काठी धाव घेतली असून तलावाची तपासणी सुरू केली आहे. या तलावावर रसुलाबादचे सरपंच राजेश सावकर, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे  यांच्यासह शाखा अभियंता मानकर आदींची उपस्थिती होती. वर्धा पाटबंधारे विभागाकडून या तलावाबाबत अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी वर्धा व पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सादर करण्यात येणार आहे. कु ऱ्हा एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे ३ दलघमी असून सध्या तो १०० टक्के भरला आहे.

Web Title: Lokmat online effect; Inspection of lakes in Wardha district; It was raining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर