बिबट्याची रुग्णालय परिसरात 'एन्ट्री' अन् सगळ्यांचीच दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 12:17 PM2021-10-25T12:17:56+5:302021-10-25T12:29:56+5:30

सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात सकाळदरम्यान बिबट्या आढळल्याने खळबळ माजलीय. हा बिबट्या रुग्णालयाच्या छतावर कर्मचाऱ्याला दिसला.

Leopard found in the meghe sawangi hospital premises vardha | बिबट्याची रुग्णालय परिसरात 'एन्ट्री' अन् सगळ्यांचीच दाणादाण

बिबट्याची रुग्णालय परिसरात 'एन्ट्री' अन् सगळ्यांचीच दाणादाण

Next
ठळक मुद्देवनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

वर्धा : सकाळी-सकाळी अचानक तुमच्या समोर एखादा बिबट्या आला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? वर्धेच्या सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात सकाळदरम्यान एक बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. 

सकाळदरम्यान हा बिबट्या रुग्णालयाच्या छतावर कर्मचाऱ्याला दिसला. बिबट्या दिसताच रुग्णालय परिसरात खळबळ माजली. रुग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगत रुग्णालयाचे दरवाजे आणि खिडक्या बंद करत वनविभागासह पोलिसांना माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येताच हा बिबट्या झाडावर बसला असल्याचे आढळले. काही वेळेतच कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावून लावले. मात्र, तो या परिसरतीलच नालीत शिरला.

मागील अर्धा तासापासून वनविभागचे कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर, रस्त्यालगत असलेल्या नालीतच त्याने आडोसा घेतल्याने रुग्णालय समोरचा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आहे.

Web Title: Leopard found in the meghe sawangi hospital premises vardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.