दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 05:00 AM2020-11-08T05:00:00+5:302020-11-08T05:00:12+5:30

डाळी आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्याने साहजिकच बेसणाचे  व तेलाचे भाव वाढले.  यामुळे आता चकली तीनशे रुपये किलो झाली आहे. मागील वर्षीच्या दीपावलीच्या तुलनेत यंदा दिवाळी फराळाचे भाव २० ते २० रुपयांपर्यंत वधारले आहे. गत काही वर्षांत रेडिमेड फराळ खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. मागणी होत असल्याने आता फराळाची दुकानेही विविध भागात रस्त्याच्या कडेला सजू लागली आहेत. मात्र, महागाईमुळे दुकानांवर फारशी गर्दी नाही.

Inflation hits Diwali farala | दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका

दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका

Next
ठळक मुद्देखाद्यतेल, डाळी महागल्याचा परिणाम ; फराळ विक्रेत्यांकडे ग्राहकांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील गाडा रुतला होता.  आता हा रुतलेला गाडा पूर्व पदावर यायला सुरुवात झाली आहे. डाळी, खाद्यतेल व इतर कडधान्य महागल्याने यंदा दिवाळीचा फराळ महागला असल्याचे चित्र असून यावर्षी दिवाळीच्या फराळाला महागाईचा  मोठा तडाखा बसला आहे.
डाळी आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्याने साहजिकच बेसणाचे  व तेलाचे भाव वाढले.  यामुळे आता चकली तीनशे रुपये किलो झाली आहे. मागील वर्षीच्या दीपावलीच्या तुलनेत यंदा दिवाळी फराळाचे भाव २० ते २० रुपयांपर्यंत वधारले आहे. गत काही वर्षांत रेडिमेड फराळ खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. मागणी होत असल्याने आता फराळाची दुकानेही विविध भागात रस्त्याच्या कडेला सजू लागली आहेत. मात्र, महागाईमुळे दुकानांवर फारशी गर्दी नाही.  हवे असणारे फराळ घरीच तयार करण्याकडे अनेकांचा कल दिसून ये त आहे.  त्यामुळे फराळ विक्रेत्यांंनाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

उपाहारगृहचालक आता दिवाळीच्या फराळाच्या कामात व्यस्त 
आर्वीत 95 बचत गट आहे त्यापैकी आधार महिला बचत गट आणि  चार ते पाच महिला बचत गट फराळाचे साहित्य बनवून द्यायचे विक्री करायचे मात्र यावर्षी  कोरोनाच्या प्रभावाने थोडा प्रतिबंध लागला आहे. यंदा फराळाची मागणीमध्ये घट झाल्याचे चित्र असून शंकरपाळे शेव करंजी चकली अनारसे यांच्या मागणीत मात्र वाढ झाली आहे 

दरवर्षी फराळाच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात. ऑर्डरनुसार ग्राहकांना आमच्या बचतगटामार्फत फराळ तयार करून दिले जाते. मात्र, यंदा दिवाळी सणावरही कोरोना विषाणू संक्रमणाचे सावट घोंगावत आहे. दिवाळी पाच-सहा दिवसांवर असताना ग्राहकांनी अद्याप फराळाच्या ऑर्डर दिलेल्या नाहीत. ऑर्डर मिळाल्यास फराळ तयार करून देऊ.
निर्मला गोडबोले,
 श्रीकृष्ण महिला बचत गट

तयार बुंदीच्या मागणीमध्ये घट 
खाद्यतेल आणि डालड्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.  त्यामुळे व्यावसायिकांकडून मोतीचूर लाडू आणि बुंदी तयार करताना भेसळीची शक्यता असल्याने मोतीचूर लाडू आणि बुंदीच्या मागणीत यंदा घट झालेली आहे. शंकरपाळे, शेव, करंजी, अनारसे यांच्या मागणीत मात्र, वाढ झाली आहे.

यंदा दिवाळीच्या पाशवभूमीवर  फराळाचे दर 20 ते 50 रुपयांपर्यंत वाढले आहे. 
खाण्याचा  तेल आणि डालडा सह   सर्वच धान्यात किराणा सामानात वाढ झाल्याने भाव वधारले आहे.
दिवाळी पाच-सहा दिवसांवर आहे. मात्र, फराळ खरेदीकडे अद्याप नागरिकांचा कल दिसून येत नाही. कोरोनामुळे यंदा फराळाला मागणी कमीच राहणार असल्याचे  व्यावसायिक विनोदसिंग राजपूत यांनी सांगितले.

Web Title: Inflation hits Diwali farala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी