जीएसटी, नोटबंदीमुळेच देशात मंदीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:11 PM2019-09-09T23:11:33+5:302019-09-09T23:12:03+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात आयोजित ‘शेतकऱ्यांची दशा आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. बाजार समितीच्यावतीने विविध योजनांचा शुभारंभ तसेच शेतकरी पाल्यांना लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

GST, recession crisis in the country due to blockade | जीएसटी, नोटबंदीमुळेच देशात मंदीचे संकट

जीएसटी, नोटबंदीमुळेच देशात मंदीचे संकट

Next
ठळक मुद्देशरद निंबाळकर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : या सरकारने सुरु केलेला जीएसटी कायदा व नोटबंदी यामुळेच, देशावर मंदीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे उद्योगधंदे व कंपन्यांनी घरघर लागल्याने कर्मचारी कपातीच धोरण अवलंबिल्या जात आहे. एकीकडे नोकरभरती बंद असून दुसरीकडे कर्मचारी कपात केली जात असल्याने बेरोजगारीची दरी कमी होण्याऐवजी आणखीच वाढत आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम शेती व्यवसायावरही पडत असल्याचे परखड मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे माजी कुलगुरुडॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले.
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरात आयोजित ‘शेतकऱ्यांची दशा आणि दिशा’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. बाजार समितीच्यावतीने विविध योजनांचा शुभारंभ तसेच शेतकरी पाल्यांना लॅपटॉप वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला माजी कुलपती डॉ. शरद निंबाळकर, आमदार रणजीत कांबळे, माधवराव घुसे, वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, हिंगणघाट बाजार समितीचे हरीश वडतकर, मधुकर डंभारे, मधुसुदन हरणे, शेष येरलेकर, संजय तपासे, उत्तमराव भोयर, अशोक उपासे, माधुरी चंदनखेडे आदींची उपस्थिती होती. हिंगणघाट बाजार समिती ज्या-ज्या शेतकरी हिताच्या योजना राबवितात त्याची दखल शासनालाही घ्यावी लागते. जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सोलर फेनसिंग करण्यासाठी बाजार समितीने एक योजना सुरू करावी अशा सूचना यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून करुन बाजार समितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी शेतकरी हिताच्या योजनांची माहिती दिली. बाजार समितीसमोर सध्या खासगी खरेदीदारांचे मोठे आव्हान आहे. परंतु शेतकऱ्यांनी खासगी व्यापाºयांकडे आपला माल घेऊन जाऊन स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, बाजार समितीमार्फत माल विकला तर मालाला योग्य दाम मिळून वेळीच मोबदला मिळण्याची हमी असल्याचे कोठारी यांनी सांगितले. या बाजार समितीचा आदर्श घेऊन शासनाने शिवपांदण ही योजना सुरू केल्याचे त्यांनी यावेळी सांगून या योजनेसाठी खर्च कमी करण्याच्या उद्देशाने बाजार समिती जेसीपी खरेदी करणार असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमादरम्यान अभियांत्रिकीच्या व्दितीय वर्षात शिकणाऱ्या ८० शेतकरी पाल्यांना लॅपटॉपचे वितरण, बैल मृत्यूमुखी पडलेल्या शेतकºयांना धनादेश वितरण, गोदाम आणि चाळणी संयंत्राचे भूमिपूजन व फळ झाडांच्या वाटपासह सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूची किट पाठविण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश डालिया यांनी केले तर आभार संजय तपासे यांनी मानले.

Web Title: GST, recession crisis in the country due to blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी