वर्ध्यात चार नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:51 AM2020-05-18T09:51:40+5:302020-05-18T09:52:01+5:30

नुकत्याच हाती अलेल्या अहवालानुसार वर्धा येथे चार नवे करोना पॉझटिव्ह रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील करोना रुग्णासंख्य आता पाचवर पोहचली आहे.

Four new corona positive patients registered in Wardha | वर्ध्यात चार नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

वर्ध्यात चार नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Next
ठळक मुद्देसर्व बाधित रुग्ण बाहेरगाहून आलेले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: नुकत्याच हाती अलेल्या अहवालानुसार वर्धा येथे चार नवे करोना पॉझटिव्ह रुग्ण आढळून आले असून, जिल्ह्यातील करोना रुग्णासंख्य आता पाचवर पोहचली आहे.
हे सर्व बाधित रुग्ण बाहेरगाहून वर्धा येथे आलेले आहेत. हिवरा तांडा हे गाव करोनाबाधित महिलेच्या मृत्यूने प्रतिबंधित करण्यात आले होते. त्याला लागूनच व प्रतिबंधित असलेल्या जामखुटा गावातील व नवी मुंबईत नोकरी करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांना बाधा झाल्याचे रात्री आढळून आले, आज पहाटे त्यांच्यावर सेवाग्राममधील कोविड रुग्णालयात उपचार सुरू झाले आहे. हा परिवार काही दिवसांपूर्वी मुंबईतून गावी आल्यानंतर त्यांना जि.प. शाळेत विलगिकरणात ठेवण्यात येऊन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, अशी माहिती विद्यासागर तहसीलदार चव्हाण यांनी दिली.
याच बरोबर आजच सावंगी येथे दाखल  धामणगाव येथून आलेले एक रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पूर्वी दाखल वाशीमच्या रुग्णावर सेवाग्राममध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या पाचवर पोहचल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आजपासूनच विलगिकरणातील रुग्णांसाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. अशातच बाधित रुग्ण आढळत असल्याने मोहिमेचे महत्व अधोरेखित होत आहे. मृत महिलेव्यतिरिक्त इतर सर्व रुग्ण वर्ध्याबाहेरील आहे, सेवाग्रामला चार तर सावंगीला दोन रुग्ण आहेत.

Web Title: Four new corona positive patients registered in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.