वर्धा जिल्ह्यातील जिनिंग फॅक्टरीला आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:37 PM2020-05-23T13:37:12+5:302020-05-23T13:37:52+5:30

सेलू तालुक्यात असलेल्या धानोली मेघे येथे असलेल्या गिरीराज जिनिंग फॅक्टरीला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रुप धारण केले व जवळपासचा कापूस व रुईगाठींनाही वेढले.

Fire at ginning factory in Wardha district; Loss of millions | वर्धा जिल्ह्यातील जिनिंग फॅक्टरीला आग; लाखोंचे नुकसान

वर्धा जिल्ह्यातील जिनिंग फॅक्टरीला आग; लाखोंचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सेलू तालुक्यात असलेल्या धानोली मेघे येथे असलेल्या गिरीराज जिनिंग फॅक्टरीला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रुप धारण केले व जवळपासचा कापूस व रुईगाठींनाही वेढले.
दुपारी १२ च्या सुमारास येथील मशीनला आग लागल्याचे कळते. या आगीने जवळपासच्या सर्वच वस्तू व मशीन्स आपल्या विळख्यात घेतल्या. वर्ध्याहून अग्निशमन दलाचे बंब नुकतेच घटनास्थळी पोहचले असून ते आग विझवत आहेत. यासंबंधीचे अधिक वृृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Fire at ginning factory in Wardha district; Loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग