लंडनच्या महिलेशी फेसबुकवरील ‘मैत्री’ ठरली धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 02:34 PM2020-02-29T14:34:24+5:302020-02-29T14:36:24+5:30

दररोज कुणा ना कुणाला सायबर भामटे आपल्या जाळ्यात अडकवित आहेत. अशीच घटना वर्धा शहरात घडली. एका महिलेने लंडनला राहात असल्याचे सांगत भेटवस्तूसाठी एक्साईज ड्यूटी हवी म्हणून व्यक्तीला ५० हजारांनी गंडा घातला.

Facebook friend cheated from London | लंडनच्या महिलेशी फेसबुकवरील ‘मैत्री’ ठरली धोक्याची

लंडनच्या महिलेशी फेसबुकवरील ‘मैत्री’ ठरली धोक्याची

Next
ठळक मुद्दे५० हजारांनी घातला गंडाव्हॉट्सअ‍ॅपवर करायचे ‘चाटिंग’

चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोशल मीडियावरून फसवणुकीच्या घटना दररोज घडत आहेत. दररोज कुणा ना कुणाला सायबर भामटे आपल्या जाळ्यात अडकवित आहेत. अशीच घटना वर्धा शहरात घडली. एका महिलेने लंडनला राहात असल्याचे सांगत भेटवस्तूसाठी एक्साईज ड्यूटी हवी म्हणून व्यक्तीला ५० हजारांनी गंडा घातला.
फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला पोलीस विभागाकडून देण्यात येतो. पण, काही जण आमिषाला बळी पडून स्वत:च या जाळ्यात ओढले जातात. वर्धा शहरातील गोंड प्लॉट परिसरातील रहिवासी माधव नारायण अहिर (४२) यांची फेसबुकवर एका अज्ञात महिलेशी मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मैत्री इतकी पुढे गेली की, माधव आणि त्या महिलेमध्ये मोबाईल क्रमांकांची देवाण-घेवाण झाली. त्यानंतर दोघेही व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांशी चाटिंग करू लागले. महिलेने मूळची दिल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगून सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले.
दोघांमध्येही मैत्री वाढू लागली. दरम्यान, काही दिवसांनी महिलेने लंडन येथून भेटवस्तू आणत असल्याचे माधव यांना सांगितले. आपल्यासाठी कोणीतरी भेटवस्तू आणणार, हे ऐकून माधवही आनंदी होता. महिलेने भारतात परत येण्याची तारीख ठरविली. त्यानुसार माधव यांना महिलेने १८ फेब्रुवारी रोजी आपण दिल्ली येथे येत असल्याचे सांगितले. १८ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास माधवला महिलेचा फोन आला आणि आपण दिल्लीच्या एअरपोर्टवर आल्याचे सांगितले. तसेच तुमच्यासाठी भेटवस्तू आणली असून माझे कार्ड ब्लॉक झाल्याने एक्साईज ड्यूटी भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. साहित्य सोडविण्यासाठी महिलेने माधवकडे पैशाची मागणी केली. लंडनची मैत्रिण भारतात आल्याच्या आनंदाने भारावून गेलेल्या माधवने लगेच पैशाची जुळवाजुळव केली.
माधव यांनी १८ रोजी सकाळी ११ वाजता आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून लंडनच्या महिलेच्या अकाऊंटवर ४६ हजार ९०० आणि ३ हजार १०० असे एकूण ५० हजार रुपये वळते केले. काहीवेळ उलटल्यावर महिलेने पुन्हा १२ वाजून २४ मिनिटांनी माधव यांना फोन केला आणि परत ७५ हजार रुपयांची मागणी केली. पुन्हा पैशाची मागणी केल्यावर मैत्रिणीची मदत करणाºया माधव यांच्यात संशयाची पाल चुकचुकली. फसगत होत असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.

बँक खाते निघाले मुंबईचे
लंडन येथील महिलेने वारंवार पैशाची मागणी केल्यावर माधव यांना फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे पाठविलेल्या बँक अकाऊंटची माहिती काढली असता ते अकाऊंट मोहम्मद जाबीर अब्दुल जब्बार सय्यद रा. ५०३ ई विंग मोनालिया एन्क्लेव्ह, महार अमरीत चांदेवली जैन मंदिर, अंधेरी मुंबई यांचे असल्याचे लक्षात आल्यानंतर माधव अहिर यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मैत्रिणीचा मोबाईल बंद असल्याने माधवची तारांबळ
माधव अहिर यांनी महिलेच्या अकाऊंटवर पैसे पाठविल्यानंतर लगेच तिच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला पण, महिलेचा मोबाईल क्रमांक सतत बंद असल्याचे समजताच माधव यांची तारांबळ उडाली. मैत्रिण येत असल्याच्या आनंदावर विरजण पडले.

Web Title: Facebook friend cheated from London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.