अधिकारीशाही संपणार, आता लोकशाही नांदणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 11:59 AM2021-11-26T11:59:14+5:302021-11-26T12:13:31+5:30

निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २१ डिसेंंबरला मतदान होणार आहे. आता या चारही नगरपंचायतीमधील अधिकारीशाही संपून महिनाभरात लोकशाही नांदणार आहे. चारही नगरपंचायतीमध्ये आरक्षण जाहीर झाल्यापासूनच राजकारण तापायला लागले आहे.

Elections in four Nagar Panchayats of wardha district | अधिकारीशाही संपणार, आता लोकशाही नांदणार

अधिकारीशाही संपणार, आता लोकशाही नांदणार

Next
ठळक मुद्देनगपंचायतीचा बिगुल वाजलावर्षभरापासून होते प्रशासक राज, रणसंग्राम तापल्याने मतदारही जोमात

वर्धा : जिल्ह्यामध्ये आष्टी, कारंजा, समुद्रपूर व सेलू या चार नगरपंचायती असून यांचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर २०२० मध्येच संपला. परंतु कोरोनाकाळामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने वर्षभरापासून या नगरपंचायतींवर प्रशासक होते. त्यामुळे अनेकांच्या नजरा निवडणुकांकडे लागल्या होत्या. अखेर निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या २१ डिसेंंबरला मतदान होणार आहे. आता या चारही नगरपंचायतीमधील अधिकारीशाही संपून महिनाभरात लोकशाही नांदणार आहे.

चारही नगरपंचायतीमध्ये आरक्षण जाहीर झाल्यापासूनच राजकारण तापायला लागले आहे. आता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे आणखीच धावपळ सुरू झाली आहे. १ डिसेंबर २०२१ पासून आता नामनिर्देशन भरायला सुरुवात होणार असून ७ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे. ८ डिसेंबरला अर्जांची छाननी करून उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. १३ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० पासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लगेच मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर होईल. त्यामुळे येत्या महिन्याभरात नगरपंचायतीवर नवे पदाधिकारी विराजमान होणार असून आता सत्ता कुणाची, हे येत्या लवकरच कळणार आहे.

अशी आहेत नगरपंचायतींची परिस्थिती

 

नगरपंचायत एकूण प्रभागएकूण मतदारमहिला पुरुष
कारंजा१७११०२२५४३०५५९२
आष्टी (शहीद)१७८५५४४०८५४४६९
सेलू१७११२५८५४९४५७६४
समुद्रपूर१७६४५२३१५५३२९७

 

नगरपंचायतनिहाय प्रभागरचनेनुसार आरक्षण

आष्टी

प्रवर्ग प्रभाग क्रमांक

- अनुसूचित जाती स्त्री प्रभाग-१

- अनुसूचित जमाती स्त्री प्रभाग-६

- नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग-२ व ५

- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रभाग-१६ व १७

- सर्वसाधारण प्रभाग-३,४,७,१०,११,१२

- सर्वसाधारण स्त्री प्रभाग-८,९,१३,१४,१५

कारंजा

प्रवर्ग प्रभाग क्रमांक

- अनुसूचित जाती स्त्री प्रभाग-१

- नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग-५ व ६

- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रभाग-४ व ८

- सर्वसाधारण प्रभाग-१०,१२,१३,१४,१५,१७

- सर्वसाधारण स्त्री प्रभाग-२,३,७,९,११,१७

सेलू

प्रवर्ग प्रभाग क्रमांक

- अनुसूचित जाती प्रभाग-१६

- अनुसूचित जमाती प्रभाग-१५

- अनुसूचित जमाती स्त्री प्रभाग-१३

- नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग-९ व १०

- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रभाग-२ व १४

- सर्वसाधारण प्रभाग-३,५,८,१२

- सर्वसाधारण स्त्री प्रभाग-१,४,६,७,११,१७

समुद्रपूर

प्रवर्ग प्रभाग क्रमांक

- अनुसूचित जाती प्रभाग-६,१६

- अनुसूचित जाती स्त्री प्रभाग-१, १७

- अनुसूचित जमाती प्रभाग-१४

- अनुसूचित जमाती स्त्री प्रभाग-२

- नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग-८

- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रभाग-७

- सर्वसाधारण प्रभाग-३,९,१२,१५

- सर्वसाधारण स्त्री प्रभाग-४,५,१०,११,१३

Web Title: Elections in four Nagar Panchayats of wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.