महावितरणचे ‘डिजिटलायजेशन’; 132 कोटी 69 लाखांचा ‘ऑनलाईन’ भरणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 05:00 AM2022-05-22T05:00:00+5:302022-05-22T05:00:20+5:30

२०२१-२२ या वर्षभरात ४ लाख ११ हजार ५१६ ग्राहकांनी तब्बल तब्बल १३२ कोटी ६९ लाख रुपयांच्या देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. यामुळे महावितरणची वाटचाल ‘डिजिटलायजेशन’कडे वळत असल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा या विभागातील वीज ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिलाच्या देयकाचा भरणा केला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याचे प्रमाण अगदी नगण्य होते.

‘Digitization’ of MSEDCL; Online payment of Rs 132.69 crore! | महावितरणचे ‘डिजिटलायजेशन’; 132 कोटी 69 लाखांचा ‘ऑनलाईन’ भरणा !

महावितरणचे ‘डिजिटलायजेशन’; 132 कोटी 69 लाखांचा ‘ऑनलाईन’ भरणा !

Next

चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नव्या तंत्रज्ञानामुळे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी ‘कॅशलेस’ वीजबिल भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७५ टक्के रकमेचा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ‘ऑनलाईन’ पर्याय निवडला आहे. २०२१-२२ या वर्षभरात ४ लाख ११ हजार ५१६ ग्राहकांनी तब्बल तब्बल १३२ कोटी ६९ लाख रुपयांच्या देयकांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. यामुळे महावितरणची वाटचाल ‘डिजिटलायजेशन’कडे वळत असल्याचे चित्र आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा या विभागातील वीज ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिलाच्या देयकाचा भरणा केला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी ऑनलाईनद्वारे वीजबिल भरण्याचे प्रमाण अगदी नगण्य होते. कोरोना काळात ऑनलाईन वीजबिल भरण्यास ग्राहकांनी पसंती दिल्याने आजघडीला हे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन वीजबिल भरत असल्यास त्या ग्राहकाला ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत सूट मिळते. ही बाब ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. महावितरणने सर्व वर्गावरील ग्राहकांना सर्व सेवा डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणच्या वेबसाईटवर तसेच मोबाईल ॲप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र आरटीजीएस सुविध उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाईन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहक सेवा देखील लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांवर असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. त्यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल ॲपची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भरारी
-    ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२०-२१ मध्ये ४ लाख ४५ हजार ८४८ ग्राहकांनी ९७ कोटी ५ लाख रुपयांचा ऑनलाईन देयकाचा भरणा केला होता. मात्र, २०२१-२२ मध्ये ही संख्या दुपटीने वाढली असून, ७ लाख ५१ हजार ६६९ ग्राहकांनी तब्बल १३२ कोटी ६९ लाख रुपयांची ऑनलाईन पद्धतीने देयके भरली आहेत, हे विशेष.

गो ग्रीन संकल्पनेकडे वाटचाल...
-    महावितरणच्या ऑनलाईन पद्धतीने गो ग्रीन या संकल्पनेला प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठीची वाटचाल यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. 
-    येत्या काळात वीजबिलाची वसुली १०० टक्के  ऑनलाईन करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न राहणार असून वीज ग्राहकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

 

Web Title: ‘Digitization’ of MSEDCL; Online payment of Rs 132.69 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.