मृताचा वारस चढविल्यावर कर्जमाफीचा मिळेल लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:00:39+5:30

वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी तब्बल ५७ हजार ५६७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. त्यानंतर त्यापैकी ५३ हजार ७३४ शेतकऱ्यांची प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरू शकत असल्याने पुढील प्रक्रियेसाठी वळती करण्यात आली. याच प्रकरणांपैकी ५० हजार ९१६ प्रकरणे प्रमाणिकरण करण्यात आली असून ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ देण्यात आला आहे.

Debt waiver benefit on inheritance of the deceased | मृताचा वारस चढविल्यावर कर्जमाफीचा मिळेल लाभ

मृताचा वारस चढविल्यावर कर्जमाफीचा मिळेल लाभ

googlenewsNext
ठळक मुद्दे३०० पेक्षा अधिक प्रकरणे : बँकेत प्रक्रिया करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सध्या जिल्ह्यात केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून २ हजार ८१८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले, पण मृत्यू झालेले असे आतापर्यंत एकूण ३०० हून अधिक प्रकरणे पुढे आली आहेत. या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांनी बँक खात्यात शासकीय मदत वळती होण्यासह कर्जाची रक्कम निरंक होण्यासाठी बँकेत जाऊन बँक खात्यात वारस चढविणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच त्या गरजूला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर करून अंमलबजावणीला सुरूवात केली. वर्धा जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी तब्बल ५७ हजार ५६७ शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली. त्यानंतर त्यापैकी ५३ हजार ७३४ शेतकऱ्यांची प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरू शकत असल्याने पुढील प्रक्रियेसाठी वळती करण्यात आली. याच प्रकरणांपैकी ५० हजार ९१६ प्रकरणे प्रमाणिकरण करण्यात आली असून ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ देण्यात आला आहे. तर उर्वरित २ हजार ८१८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण केले जात आहे. आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. असे असले तरी आतापर्यंतच्या प्रक्रियेत ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या प्रकरणात त्रुटी आढळल्या आहेत. यात बहुतांश पात्र लाभार्थी शेतकरी मृत असल्याचे पुढे आले आहे. याच शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी बँकेत जाऊन मृत तथा पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्याचा वारस जोडणे क्रमप्राप्त आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या लाभार्थ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

४३०.५४ कोटी शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा
आतापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४८ हजार ३९९ शेतकºयांच्या बँक खात्यात ४३०.५४ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे.

२२ प्रमुख बॅँकांच्या १४४ शाखा
जिल्ह्यात प्रमुख एकूण २२ बँकांच्या सुमारे १४४ शाखा आहेत. याच बँकांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ सध्या जिल्ह्यातील हवालदिल शेतकºयांना दिला जात आहे.

आतापर्यंत ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४३०.५४ कोटी वळते करून त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. तर २ हजार ८१८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण केले जात आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेले; पण मृत्यू झालेले अशी ३०० हून अधिक प्रकरणे आतापर्यंत चौकशीत पुढे आली आहेत. त्यामुळे या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी मृत शेतकऱ्यांचा वारस कोण, हे बँकेत जात आवश्यक कागदपत्रे देऊन नाव चढवावे. त्यानंतरच अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल.
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.

Web Title: Debt waiver benefit on inheritance of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.