नैसर्गिकरीत्या उगविलेल्या रोपट्यांना जगविण्याचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:13 PM2019-09-09T23:13:41+5:302019-09-09T23:14:18+5:30

जिभेचे चोचले भागविण्यासाठी आपण ऋृतूमानाप्रमाणे आंबा, जांभूळ, बोर, सिताफळ, दाळींब,पपई, पेरु, चिकू व बदाम आदी फळांचा आस्वाद घेतो. त्यानंतर त्या फळांमधील घुया (बिया/कोय) इतरत्र फेकून देतो. त्यामुळे गावातील रस्ता-नाल्याच्या कडेला तसेच खतांच्या ढिगाºयावर त्या घुयांपासून विविध रोपटे नैसर्गिकरित्या उगवितात.

The courage to live naturally grown seedlings | नैसर्गिकरीत्या उगविलेल्या रोपट्यांना जगविण्याचा ध्यास

नैसर्गिकरीत्या उगविलेल्या रोपट्यांना जगविण्याचा ध्यास

googlenewsNext
ठळक मुद्देवृक्षमित्रांचा अनोखा उपक्रम : खतांच्या ढिगाऱ्यावरुन गोळा केली रोपटी

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर: एकीकडे वृक्षारोपणाकरिता महागडे रोपटे खरेदी करुन त्याचे रोपण केले जाते तर दुसरीकडे नैसर्गिकरित्या उगविणाºया विविध फळांच्या झाडांकडे दुर्लक्ष केले जाते. आता अल्लीपूर येथील काही वृक्षमित्रांनी एकत्र येत नैसर्गिकरित्या उगविलेल्या रोपट्यांना जगविण्याचा ध्यास घेतला असून जवळपास १६५ रोपटे ठिकठिकाणाहून गोळा केली आहे. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाने इतरांनाही नवीन शिकवण दिली आहे.
जिभेचे चोचले भागविण्यासाठी आपण ऋृतूमानाप्रमाणे आंबा, जांभूळ, बोर, सिताफळ, दाळींब,पपई, पेरु, चिकू व बदाम आदी फळांचा आस्वाद घेतो. त्यानंतर त्या फळांमधील घुया (बिया/कोय) इतरत्र फेकून देतो. त्यामुळे गावातील रस्ता-नाल्याच्या कडेला तसेच खतांच्या ढिगाºयावर त्या घुयांपासून विविध रोपटे नैसर्गिकरित्या उगवितात. त्यांचे योग्य संगोपण होत नसल्याने कालांतराने ते रोपटे जागेवरच वाळून नाहिसे होतात.
अशा रोपट्यांना जगविण्यासाठी अल्लीपुरातील वृक्षमित्रांनी धडपड चालविली आहे. त्यांनी गावातील प्रत्येक रस्त्यांनी फेरफटका मारुन खताच्या ढिगाºयावरुन नैसर्गिकरित्या उगविलेले रोपटे गोळा केलेत. पहिल्याच दिवशी त्यांनी १६८ रोपटे गोळा केले असून त्या रोपट्यांना प्लास्टीकच्या पिशवीत माती व खताचे मिश्रण करुन लावले आहे.
गावातील प्रत्येक भागात फिरुन नैसर्गिकरित्या उगविलेले रोपटे गोळा करण्याचा उपक्र म सातत्याने राबवून गोळा झालेले रोपटे प्लास्टीकच्या पिशवीत लावून त्यांचे काही दिवस संगोपण केल्यानंतर ते ठिकठिकाणी लावले जाणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी वृक्षमित्र व निसर्गमित्र पुरस्कार प्राप्त निलेश धोंगडे यांच्यासह आकाश पडोळे, केतन हिंगे व आशिष राऊत परिश्रम घेत आहे.

वर्षभरानंतर करणार रोपण
वृक्षमित्रांनी पहिल्याच दिवशी १६८ झाडे गोळा केली आहेत. त्यामध्ये आंब्याचे ६०, जांभळाचे ६६, बदामाचे ४१ आणि पिंपळाच्या एका रोपट्याचा समावेश आहे. ही रोपटे प्लास्टिकच्या पिशवीत एका वर्षापर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर विविध उपक्रमाच्या माध्यमातून हे रोपटे लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे रोपण केले जाणार आहे. यामुळे रोपट्यावरील खर्चात बचत होऊन वृक्षसंवर्धनाच्या कार्याला हातभार लागणार आहे.

Web Title: The courage to live naturally grown seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग