Bruno swallowed the spoon .. and havoc in family | ‘ब्रुनो’ने गिळला चमचा.. आणि उडाली तारांबळ

‘ब्रुनो’ने गिळला चमचा.. आणि उडाली तारांबळ

ठळक मुद्देवर्ध्यात पहिल्यांदाच झाली अनोखी यशस्वी शस्त्रक्रिया


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नऊ महिन्याच्या एका लॅब्राडोर प्रजातीच्या श्वानाने खेळताखेळता स्टेनलेस स्टिलचा चमचा गिळून टाकला. त्यानंतर या श्वानाची प्रकृती अचानक बिघडली. त्याचा एक्सरे काढला असता त्याच्या पोटात चमचा असल्याचे दिसून आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून श्वानाच्या पोटातील चमचा बाहेर काढला. श्वानावर अशा प्रकारे करण्यात आलेली ही जिल्ह्यातील पहिली शस्त्रक्रिया ठरू पाहत असल्याचे सांगण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, सिंदी रेल्वे येथील गाढवे यांच्याकडील नऊ महिन्यांच्या ब्रुनो नामक लॅब्राडोर प्रजातीच्या श्वानाची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी श्वानाला वर्धा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेले. तेथे या श्वानाच्या एक्सरे काढण्यात आला. या एक्सरेवरून या श्वानाच्या पोटात चमचा असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या श्वानावर शस्त्रक्रिया करून हा चमचा त्याच्या पोटाबाहेर काढावा लागेल असे श्वान मालकाला सांगितले. श्वान मालकाने त्यासाठी होकार दर्शविल्यानंतर या श्वानावर शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातील चमचा बाहेर काढण्यात आला आहे.

ब्रुनो नामक लॅब्राडोर प्रजातीच्या श्वानाच्या पोटात चमचा असल्याचे लक्षात येताच श्वान मालकाला श्वानावर शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगण्यात आले. त्यांनीही तातडीने होकार दर्शविला. त्यानंतर या श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातील चमचा बाहेर काढण्यात आला आहे.
- डॉ. संदीप जोगे, पशुवैद्यकीय अधिकारी.

Web Title: Bruno swallowed the spoon .. and havoc in family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.