आर्वीच्या नगराध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:00 AM2020-09-01T05:00:00+5:302020-09-01T05:01:17+5:30

नगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यामुळे कर्मचाºयांनी काम बंद केले आहे. परिणामी गेल्या सहा ते सात दिवसांपासून वॉर्डामध्ये फिरणाऱ्या घटागाड्याही बंद असल्याने सर्वत्र कचºयाचे ढिगारे साचले आहेत. भाजी मार्केट, नेहरू मार्केट, इंदिरा मार्केट व शहरातील २३ वॉर्डातील नाली सफाईचे काम सुद्धा ठप्प पडले आहे. या घाणीचा नागरिकांना त्रास होत असून कोरोनाकाळातील ही अस्वच्छता पाहून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Arvi's mayor protested by the authorities | आर्वीच्या नगराध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध

आर्वीच्या नगराध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध

Next
ठळक मुद्देशहरात अस्वच्छतेचा कळस : खुर्चीवर टाकले बेसरमचे झाडं

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतानाही शहरामध्ये गेल्या सहा ते सात दिवसांपासून वॉर्डातील नाल्या सफाईचे काम बंद आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या १२ नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून बेसरमचे झाडं ठेवत कार्यप्रणालीचा निषेध केला.
नगरपालिकेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. परिणामी गेल्या सहा ते सात दिवसांपासून वॉर्डामध्ये फिरणाऱ्या घटागाड्याही बंद असल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. भाजी मार्केट, नेहरू मार्केट, इंदिरा मार्केट व शहरातील २३ वॉर्डातील नाली सफाईचे काम सुद्धा ठप्प पडले आहे. या घाणीचा नागरिकांना त्रास होत असून कोरोनाकाळातील ही अस्वच्छता पाहून नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे नगराध्यक्ष दुर्लक्ष करीत असल्याने सत्ताधारी पार्टीच्या सदस्यांनी नगराध्यक्षकांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला. तसेच उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांची भेट घेवून शहरात स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपचे गटनेते प्रशांत ठाकूर, भाजपाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक जगनराव गाठे, आरोग्य सभापती गंगा चकोले, नगरसेवक प्रकाश गुल्हाने, सुनील बाजपेयी, उषा सोनटक्के, हर्षल पांडे, मिथून बारबैले, कैलास, अजय कटकमवार,शांताबाई कसार, रामू राठी यांची उपस्थिती होती.

आज नगरपालिकेमध्ये काही नगरसेवक उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. यावेळी नगराध्यक्षांचे दालन बंद होते. काही वेळाने नगराध्यक्षांच्या खुर्चीला चपलांचा हार घातल्याची माहिती मिळाली.
- रणजित पवार, प्रभारी मुख्याधिकारी, आर्वी.

शहरातील अस्वच्छतेबाबत माझ्याशी एकाही नगरसेवकाने चर्चा केली नाही. त्यासंदर्भात अद्याप कोणतेही निवेदन प्राप्त झाले नाही. नगरसेवकांनी असे का केले, याचे निश्चित कारणही मला माहिती नाही.
- प्रा. प्रशांत सव्वालाखे, नगराध्यक्ष.

Web Title: Arvi's mayor protested by the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.