अल्लीपूर ठाण्याचा क्रमांक ‘आऊट ऑफ सर्व्हिस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:16+5:30

शनिवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीच्या घडलेल्या घटनांची माहिती घेण्यासाठी दुरध्वनीने संपर्क केला असता स्टेशन डायरीवर असलेल्या कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि दोन ते तीन मारहाणीच्या घटना असल्याचे सांगून दुरध्वनीचा रिसिव्हर बाजूला ठेवला. काही वेळानंतर पुन्हा संपर्क केला असता दुरध्वनी ‘आऊट ऑफ सर्व्हीस’ असल्याचे ऐकू येत होते.

Alipuripur Police Station number out of service | अल्लीपूर ठाण्याचा क्रमांक ‘आऊट ऑफ सर्व्हिस’

अल्लीपूर ठाण्याचा क्रमांक ‘आऊट ऑफ सर्व्हिस’

googlenewsNext
ठळक मुद्देवरिष्ठांचे दुर्लक्ष । सामान्यांच्या तक्रारी घेणार कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी वादग्रस्त ठरणारे अल्लीपूर पोलीस ठाण्याचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक ‘आउट ऑफ सर्व्हिस’ असल्याने सामान्यांच्या तक्रारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शनिवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीच्या घडलेल्या घटनांची माहिती घेण्यासाठी दुरध्वनीने संपर्क केला असता स्टेशन डायरीवर असलेल्या कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि दोन ते तीन मारहाणीच्या घटना असल्याचे सांगून दुरध्वनीचा रिसिव्हर बाजूला ठेवला. काही वेळानंतर पुन्हा संपर्क केला असता दुरध्वनी ‘आऊट ऑफ सर्व्हीस’ असल्याचे ऐकू येत होते.
सद्रक्षणाय, खलनीग्रहनाय हे ब्रीद घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस ठाण्यातील हा भोंगळ कारभार पुढे आला आहे. यासंदर्भात अधीकची माहिती घेण्यासाठी अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरध्वनीचे केबल तुटले असेल, फोन दोन दिवसांपासून बंद आहे, बीएसएनएल कार्यालयाला सांगितले आहे, असे उडवा-उडवीचे उत्तर देऊन आपली बाजू सावरण्यातच धन्यता मानली.
तसेच त्यांना गुन्ह्यांची माहिती विचारली असता त्यांनी मी बाहेर असून ठाण्यात गेल्यावर कळतो, असे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणाच्या चौकशीसाठी वादग्रस्त ठरलेले अल्लीपूर पोलीस ठाण्यात अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी भेट देत प्रकरणाचा आढावा घेतला होता. अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्याप्रमाणात दारूचा गोरखधंदा चालतो. इतकेच नव्हे तर दारूविक्रेत्यांचे काही पोलीस कर्मचाऱ्यांशी मैत्रिपूर्ण संबंध आहेत.

Web Title: Alipuripur Police Station number out of service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.