वर्धा जिल्ह्यातील आमदारांच्या मते विकासाची प्रक्रिया होणार गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 05:33 PM2019-11-23T17:33:06+5:302019-11-23T17:35:32+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्धा जिल्ह्यातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

According to the MLAs of Wardha district, the process of development will be slow | वर्धा जिल्ह्यातील आमदारांच्या मते विकासाची प्रक्रिया होणार गतीमान

वर्धा जिल्ह्यातील आमदारांच्या मते विकासाची प्रक्रिया होणार गतीमान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्धा जिल्ह्यातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

जनादेशाचा आदर केला - रामदास तडस
विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीला जनतेने जनादेश दिला होता. शिवसेनेकडून याचा अनादर झाला. मात्र जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार विराजमान झाले आहे. हे सरकार जनतेच्या सर्व आकांक्षा पूर्ण करतील व विकासाकडे वेगाने वाटचाल होईल. देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाल्याने राज्यातील विकासाची प्रक्रिया गतीमान होण्यास मदत होणार आहे व हीच जनतेचीही इच्छा होती. अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे.

जनतेची इच्छा पूर्ण झाली - समीर कुणावार
महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीला जनादेश दिला होता यात भारतीय जनता पक्ष १०५ जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष होता. राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे. अशी सर्व जनतेची इच्छा होती. मात्र शिवसेना पुवीर्पासूनच सरकारच्या सरकार स्थापनेत विरोधकाची भूमिका घेऊन होती. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. हे सरकार निश्चितपणे विश्वासमत पारित करेल व महाराष्ट्राची पुन्हा विकासाकडे वाटचाल सुरू होईल. अशी प्रतिक्रिया हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी दिली आहे.

सत्तेचा दुरूपयोग करून सरकार स्थापन- अ‍ॅड.. चारूलता टोकस
राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट रातोरात हटवून राज भवनातून सत्ता स्थापनेचे काम भाजपने केले. हा सारा प्रकाश कळण्याच्या पलीकडला आहे. व तो योग्यही नाही. अजित पवार यांच्यावर कुठला दबाव होता. हे तेच सांगू शकतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची बोलणी सुरू असताना ही घटना घडली.अशी प्रतिक्रीया काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष  चारूलता टोकस यांनी दिली आहे.

विकासाची प्रक्रिया वेगवान होईल. - डॉ. पंकज भोयर, आमदार
जनतेला सरकार स्थापनेची बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षा होती. शनिवारी ब्रम्ह मुहूर्तावर ही प्रतिक्षा संपली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार राज्यात सत्तारूढ झाले. भाजपला १०५ जागा देवून जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. सरकार स्थापनेनंतर आता विकासाची घोडदौड अशीच सुरू राहील.

 

 

Web Title: According to the MLAs of Wardha district, the process of development will be slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.