वर्ध्यात ४८ तासांत ३३० दुचाकीचालकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 03:29 PM2020-01-17T15:29:09+5:302020-01-17T15:30:46+5:30

नागपूर मार्गावरील पवनार शिवारात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने नाकेबंदी करीत ४८ तासांत तब्बल ३३० दुचाकी चालकांवर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे.

330 bicyclists fined within 48 hours in Wardha | वर्ध्यात ४८ तासांत ३३० दुचाकीचालकांना दंड

वर्ध्यात ४८ तासांत ३३० दुचाकीचालकांना दंड

Next
ठळक मुद्देहेल्मेटचा वापर न करणे भोवलेवाहतूक पोलीस व आरटीओची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सडक सुरक्षा...जीवन रक्षा या ब्रीद वाक्याला सार्थकी लावण्याचा प्रयत्न सध्या वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग प्रयत्न करीत आहेत. या दोन्ही विभागाने वर्धा-नागपूर मार्गावरील पवनार शिवारात नाकेबंदी करीत ४८ तासांत तब्बल ३३० दुचाकी चालकांवर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे याच मार्गावर काही दिवसांमध्ये सतत अपघात झालेत. यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले. वाहन चालविताना सदर व्यक्तींनी हेल्मेटचा वापर न केल्याचेही या दोन्ही विभागांच्या लक्षात आल्याने या मार्गावर हेल्मेट सक्तीबाबतची ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहीम सतत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 330 bicyclists fined within 48 hours in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.