४० पैकी ३० फूट रस्त्यावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:00 AM2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:17+5:30

रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाली गेली आहेत.सांडपाणी वाहून जाण्याऐवजी रहिवाशांच्या थेट घरात शिरत आहे.

3 feet out of 5 on the road | ४० पैकी ३० फूट रस्त्यावर अतिक्रमण

४० पैकी ३० फूट रस्त्यावर अतिक्रमण

Next
ठळक मुद्देआर्वी मार्गाचे रुंदीकरण ठरतेय व्यर्थ : दुभाजक बसविण्याकरिता कंत्राटदाराला सापडेना मुहूर्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी याकरिता आर्वी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले; मात्र उद्देशच सार्थ होत नसल्याचे चित्र आहे. एकूण चाळीसपैकी तीस फूट मार्गाला अतिक्रमणाने विळखा घातलेला असतो. परिणामी, दररोज किरकोळ अपघाताच्या घटना घडतात.
छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जुनापाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. आर्वी नाका चौक ते जुनापाणी रस्त्यापर्यंत रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. तब्बल ३५ कोटी रुपये या मार्गाच्या बांधकामावर खर्ची घालण्यात आले. मात्र, संपूर्ण बांधकाम नियोजनाच्या अभावातच पार पडले. रस्ता बांधकाम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात आले नाही. पक्षपात करीत अतिक्रमणकर्त्यांना अभय देण्यात आले. अद्याप रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक आणि रहिवाशांचे अतिक्रमण कायम असल्याने रस्ता रुंदीकरण खरेच झाले काय, असा प्रश्न पडतो. सायंकाळी एकेरी रस्त्यावर फेरीवाल्यांनी कब्जा केलेला असतो. यातच भाजी-फळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाहने, यामुळे येथे दररोज वाहतूकव्यवस्था कोलमडते. त्यातच मोकाट जनावरांनी काही दिवसांपासून शहरातील विविध मार्ग आणि चौकात ठिय्या देणे सुरू केले आहे. या मार्गावरही मधोमध जनावरांचा मुक्काम असतो. त्यामुळे अद्याप वाहतुकीला मोकळा श्वास घेता येत नसल्याचे चित्र आहे. रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाली गेली आहेत.सांडपाणी वाहून जाण्याऐवजी रहिवाशांच्या थेट घरात शिरत आहे. कित्येक दिवसांपासून करून ठेवलेल्या खोदकामामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकामात असा अनागोंदी कारभार सुरू असताना बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचीही या प्रकाराला मूकसंमती दिसून येत आहे. आर्वी नाका ते जुना पाणी चौकापर्यंत रस्ता बांधकाम पूर्णत्वास जाऊन कित्येक महिने लोटले. मात्र, अद्याप दुभाजक बसविण्यात आले नाही.

आर्वी नाका चौकात अतिक्रमण
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाक्यापर्यंत एका बाजूने रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले. दुसºया बाजूने काम केले जात आहे. यामुळे वाहतुकीचा संपूर्ण ताण एकाच मार्गावर आहे. असे असताना चौकातील इटनकर पान पॅलेस, चहाटपऱ्यांसमोर अवैधरीत्या तासन्तास वाहने उभी दिसतात. यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. चौकात वाहतूक पोलिस तैनात असतात. त्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे. कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मोकाट जनावरांची धरपकड कधी?
शहरातील विविध मार्ग आणि चौकात मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत असून नागरिकांना त्यांनी अक्षरश: वेठीस धरले आहे. रहदारीला नित्याने अडथळा निर्माण होत असून दररोज कोणत्या ना कोणत्या भागात जनावरांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, नगरपालिकेने अद्याप जनावरांची धरपकड सुरू केलेली नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी
आर्वी मार्गावर सायंकाळनंतर हातगाडीच्या माध्यमातून फळ, भाजी विकणाºयांकडून अतिक्रमण केले जाते. खरेदीकरिता ग्राहकही गर्दी करतात. ग्राहक वाहनेही हातगाडीपुढेच उभे करतात. यामुळे या मार्गावरील वाहतूक असुरक्षित झाली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करीत रस्ता वाहतुकीकरिता मोकळा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: 3 feet out of 5 on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.