चार दिवसांत २७ व्यक्तींचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:00 AM2020-09-19T05:00:00+5:302020-09-19T05:00:08+5:30

स्ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन सध्या आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन किटचा वापर करून कोविड चाचणी केली जात आहे. अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केल्यास अहवाल अवघ्या एक तासाच्या आत प्राप्त होत असल्याने अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी करण्याची पद्धत सध्या वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे.

27 killed in four days | चार दिवसांत २७ व्यक्तींचा बळी

चार दिवसांत २७ व्यक्तींचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देकोविड पसरवितोय पाय : मृतांमध्ये पाच महिलांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाचा सप्टेंबर महिना वर्धेकरांच्या अडचणीत भर टाकणाराच ठरू पाहत आहे. सध्या दिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोविड मृत्यूचाही आकडा वाढत आहे. मागील चार दिवसांत एकूण २६ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात पाच महिलांचाही समावेश आहे.
स्ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन सध्या आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन किटचा वापर करून कोविड चाचणी केली जात आहे. अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केल्यास अहवाल अवघ्या एक तासाच्या आत प्राप्त होत असल्याने अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी करण्याची पद्धत सध्या वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे. गुरूवार १७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील २९ हजार २२४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २ हजाार ९८८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर १ हजार ४७१ व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवसांत ४१८ नवीन कोविड बाधित आढळले असून २१८ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर २६ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

कोरोनाला २१८ व्यक्तींनी हरविले
मागील चार दिवसांत जिल्ह्यात ४१८ नवीन कोविड बाधित सापडले असले तरी २१८ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर शुक्रवारी ५७ व्यक्ती कोविडमुक्त झाले आहेत.

Web Title: 27 killed in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.