साधारण गुन्ह्यांतील २६ बंदीवानांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:07+5:30

संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. देशातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोना विषाणूने आता राज्यातही आपले पाय हळू हळू पसरले आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असताना कारागृहात असलेल्या बंदीवानांचाही विचार शासनाने केलेला आहे.

26 detainees released from common crimes | साधारण गुन्ह्यांतील २६ बंदीवानांची सुटका

साधारण गुन्ह्यांतील २६ बंदीवानांची सुटका

Next
ठळक मुद्देकोरोनाचा धसका । २५२ बंदींच्या प्रस्तावाला न्यायालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा

चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या देशात कोरोना विषाणूने कहर केला असून या महामारीला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. गृहविभागाच्या आदेशानुसार तसे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात असलेल्या साधारण बंदीवानांना सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जे बंदीवान साधारण गुन्ह्यांच्या स्वरुपात कारागृहात होते अशा २६ बंदीवानांना शुक्रवारी कारागृहातून सोडण्यात आले.
संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. देशातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोना विषाणूने आता राज्यातही आपले पाय हळू हळू पसरले आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येत असताना कारागृहात असलेल्या बंदीवानांचाही विचार शासनाने केलेला आहे.
जे बंदीवान साधारण गुन्ह्यात कारागृहात आलेले आहे अशांना सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्याअनुषंगाने वर्धा जिल्हा कारागृहात बंदीवानांची गर्दी वाढू नये, यासाठी साधारण गुन्ह्यांच्या स्वरुपात अडकलेल्या २६ बंदीवानांना शुक्रवारी सोडण्यात आले आहे.
वर्धा जिल्हा कारागृहात २५२ बंदीवानांची क्षमता आहे. सध्या कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे ३५२ बंदीवान आहेत.
सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा लागणाऱ्या कलमांन्वये तसेच साधारण स्वरुपाच्या गुन्ह्यातील तब्बल २६ बंदीवानांना कारागृहातून सोडण्यात आले आहे. तर २७० बंदीवानांना कारागृहातून मुक्त करण्यासाठी विनंती अर्ज संबंधीत न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे. न्ययालयाकडून त्यांचा विचार झाल्यावरच त्या बंदीवानांना देखील सोडण्यात येणार आहे.

कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच बंदीवानांची तपासणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहात आणल्या जाणाऱ्या बंदीवानांची कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जर एखाद्या बंदीवानाला सर्दी, खोकला झाल्याचे निदर्शनास येताच त्यांना रुग्णालयात दाखल केल्या जात आहे.

हिंगणघाट न्यायालयाने सोडले सहा बंदी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयीन कामकाज देखील बंद ठेवण्यात आले आहे. पण, न्यायालयातील एक कोर्टाचे कामकाज मात्र, सुरू आहे. जिल्हा कारागृह प्रशासनाने २७० बंदीवानांना सोडण्याचे विनंती अर्ज संबंधित न्यायालयात दाखल केले होते. त्यापैकी २६ बंदीवानांना सोडण्यात आले. यामध्ये हिंगणघाट न्यायालयाने ६ बंदीवानांची सुटका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साधारण स्वरुपातील असलेल्या तसेच सात वर्षे शिक्षेच्या आतील येत असलेल्या बंदीवानांना मुक्त करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार आतापर्यंत २६ बंदीवानांना कारागृहातून सोडण्यात आले आहे तर २५२ बंदीवानांचे विनंतीअर्ज संबंधित न्यायालयाकडे पाठविण्यात आले आहे. संबंधित न्यायालय याबाबतचा विचार करणार आहे.
सुहास पवार, कारागृह अधीक्षक, जिल्हा कारागृह, वर्धा.

Web Title: 26 detainees released from common crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग