‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात २४ ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:45 PM2021-01-20T12:45:41+5:302021-01-20T12:49:21+5:30

Wardha News वर्धा जिल्ह्यात राज्यस्तर आणि स्थानिक स्तर असे एकूण १०५ पशुवैद्यकीय संस्था असून, त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे.

24 Rapid Response Teams formed in Wardha district to prevent bird flu | ‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात २४ ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तयार

‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात २४ ‘रॅपिड रिस्पॉन्स टिम’ तयार

Next
ठळक मुद्देसतर्कता बाळगण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज

 लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : जिल्ह्यात अद्यापही बर्ड फ्लूचे निदान झाले नाही. मात्र, स्थलांतरित पक्षी, पानथळे, तलाव तसेच पोल्ट्री फार्म येथे यंत्रणांनी पाळत ठेवून सतर्क राहावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. जिल्ह्यात राज्यस्तर आणि स्थानिक स्तर असे एकूण १०५ पशुवैद्यकीय संस्था असून, त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. रोगाचा शिरकाव झाल्यास दक्षता घेण्यासाठी प्रत्येकी तीन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या २४ शिघ्र कृतिदल (रॅपिड रिस्पॉन्स टिम) तयार करण्यात आल्या आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही निर्मिती करण्यात आली आहे.

बर्ड फ्लूचा प्रसार स्थलांतरित पक्ष्यामुळे होतो. पक्षी तलाव व लगतच्या कार्यक्षेत्रात राहत असल्याने संबंधित यंत्रणांना एव्हियन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्लू) रोग प्रादुर्भाव संबंधी सतर्कता बाळगण्यासाठी लघुसिंचन विभाग, वनविभाग, पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी व स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये असाधारण मृत पक्षी दिसून आल्यास त्वरित जवळच्या सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशु चिकित्सालय किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ओम्बासे यांनी केले आहे. आहाराच्या पद्धती लक्षात घेता तसेच अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास या रोगाचा विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोंबडी विक्रेत्यांनी ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत होण्यासाठी मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे यांनी केले.

प्रत्येक ग्रामपंचायतीने धुण्याचा सोडा ( ठं2उङ्म3 सोडियम कार्बोनेट) चे 1 लिटर पाण्यामध्ये ७ ग्रॅम याप्रमाणे द्रावण तयार करून कोंबड्यांची खुराडे, गुरांचे गोठे, गावातील गटारे, नाल्या, पशुपक्ष्यांचा वावर असलेल्या भिंती व जमिनीवर तत्काळ फवारणी करावी. दर १५ दिवसांच्या अंतराने ३ वेळा फवारणी करावी, सद्य:स्थितीत जिल्ह्यात कुक्कुट पक्षी, वन्यपक्षी व स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये कुठेही असाधारण मृतकांची नाही. पक्ष्यांमध्ये असाधारण मृतक दिसून आल्यास नजीकच्या पशुवैद्याकीय दवाखाना, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करावा. असे आवाहन सभापती माधव चंदनखेडे, सत्यजित बढे, प्रवीण तिखे यांनी केले आहे.

असा होतो संसर्ग...

जागतिक आरोग्य संघटनेनुसार बर्ड फ्लू हा कुक्कुट पक्षांना विषाणुमुळे होणारा रोग असून संसर्गजन्य रोग आहे. यात सर्वात संसर्गजन्य स्ट्रेन एच ५ एन १ आहे. एव्हिएन इन्फल्युएन्झा या विषाणुचे अ,ब,क असे तीन प्रकार आहे. अ विषाणू हा कुक्कुटपक्षी, अन्य पक्षी, प्राणी तसेच मानवांमध्ये आढळत असून, विषाणू बी व सी फक्त मानवांमध्ये आढळतो. या विषाणुद्वारे रोग उद्भवण्याचा कालावधी २४ तास ते १४ दिवसांचा आहे. या विषाणूचा प्रसार एका कुक्कुट पक्षातून दुसऱ्या कुक्कुट पक्षांमध्ये मुख्यत: हवेतून व स्थलांतरित पक्षी, वन्यपक्ष्यांच्या माध्यमातून होतो.

 

रोगाची लक्षणे

- उदासीनता.

- भूक मंदावणे.

- अंडी उत्पादन कमी होणे.

-शिंकणे व खाेकणे.

- डोळ्यांतून पाणी येणे.

- डोक्यावर सूज येणे.

- डोक्यावरील तुऱ्यावर फोड येणे.

- पंख नसलेला भाग निळसर पडणे.

अशी घ्यावी काळजी...

प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोल्ट्री फार्मला इतर राज्यांतून, जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण व पक्षिगृहांना बाहेरून निर्जंतुकीकरणासाठी २ टक्के सोडिअम हायड्रोक्साइड किंवा २ ते ४ टक्के सोडिअम हायपोक्लोराइटचा वापर करावा.

मृत पक्ष्यांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करू नये, परस्पर विल्हेवाट लावू नये.

Web Title: 24 Rapid Response Teams formed in Wardha district to prevent bird flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.