१४५ खाटांच्या ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:14+5:302021-05-06T04:35:14+5:30

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असणारी यंत्रणा अपुरी पडत असल्याने श्री तुळजाभवानी ...

Work on 145-bed oxygen pipeline completed | १४५ खाटांच्या ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण

१४५ खाटांच्या ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्ण

googlenewsNext

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असणारी यंत्रणा अपुरी पडत असल्याने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे उपजिल्हा रुग्णालयावर येणारा ताण कमी व्हावा व प्रत्येक गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळावा या उद्देशाने आठवडी बाजार येथील १२४ भक्तनिवास कोविड सेंटरमध्ये १४५ बेडला ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. याच्या जोडीला पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पंधरा ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. या सुविधेमुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या काेविड रुग्णांना ऑक्सिजन खाट उपलब्ध हाेण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. यासाठी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे, आदींनी पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Work on 145-bed oxygen pipeline completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.