उस्मानाबादमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न ? चौथ्या मजल्यावरून पडल्याने प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 02:19 PM2019-05-31T14:19:42+5:302019-05-31T14:22:32+5:30

या दुर्घटनेला लैंगिक छळाची किनार

Women police inspector suicide attempt in Osmanabad? seriously injured after falling from the fourth floor | उस्मानाबादमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न ? चौथ्या मजल्यावरून पडल्याने प्रकृती गंभीर

उस्मानाबादमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न ? चौथ्या मजल्यावरून पडल्याने प्रकृती गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देहा अपघात होता की आत्महत्येचा प्रयत्न, याची आता चौकशी होत आहे. त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. 

उस्मानाबाद : येथील शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मनीषा गिरी या आज सकाळी राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, हा अपघात होता की आत्महत्येचा प्रयत्न, याची आता चौकशी होत आहे. या दुर्घटनेला लैंगिक छळाची किनारही देण्यात येत आहे.

उस्मानाबाद शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक मनीषा गिरी या त्या राहत असलेल्या घराच्या चौथ्या मजल्यावरून शुक्रवारी सकाळी खाली पडल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला व अन्य ठिकाणी जबर मार बसला आहे. शरीरात 2 ते 3 फ्रॅक्चर झाले असून, रक्तस्रावही बराच झाला आहे. बेशुद्धावस्थेत त्यांना जवळीलच एक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. 

लैंगिक छळाची दुर्घटनेला किनार...
दरम्यान, मनीषा गिरी यांच्या काही नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दोन महिन्यांपूर्वी त्या कार्यरत असलेल्या आनंदनगर ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने लज्जास्पद वागणूक दिल्याची तक्रार गिरी यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, त्यांचा अहवाल अद्याप पूर्ण झाला नाही. यादरम्यान, काही विकृत गिरी यांना ब्लॅकमेल करीत असल्याने, त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा दावा त्यांचे नातेवाईक करीत आहेत.

तथ्य आढळल्यास तात्काळ कारवाई : पोलीस अधीक्षक
हा अपघात की आत्महत्या, हे गिरीच स्पष्टपणे सांगू शकतील. आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. शुद्धीत आल्यानंतर दिलेल्या जबाबानुसार कार्यवाही होईल. छळ प्रकरणाची चौकशी लावली असून, त्याचा अहवाल मागविला आहे. यातील दोषींवर तातडीने कारवाई होईल, असे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

Web Title: Women police inspector suicide attempt in Osmanabad? seriously injured after falling from the fourth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.