कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:37 AM2021-03-01T04:37:27+5:302021-03-01T04:37:27+5:30

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील खंडाळा गावानजीक अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील कार (क्र. एमएच.०९-बीबी.४७१९) निष्काळजीपणे ...

Two-wheeler killed in car crash | कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

googlenewsNext

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील खंडाळा गावानजीक अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील कार (क्र. एमएच.०९-बीबी.४७१९) निष्काळजीपणे चालवून समाेरील दुचाकीला (क्र.एमएच. २५-बीबी.१२७३) पाठीमागून जाेराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार प्रवीण बाळासाहेब भिसे (वय २५, रा.सारसा, जि. लातूर) हे गंभीर जखमी हाेऊन मयत झाले. अपघाताच्या घटनेनंतर संबंधित अज्ञात चालकाने दुचाकीस्वारास दवाखान्यात न दाखल करता, घटनास्थळावरून वाहनासह पाेबारा केला. या प्रकरणी मयताचे नातेवाईक संताेष प्रकाश भिसे (रा. सारसा) यांनी २७ फेब्रुवारी राेजी तुळजापूर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात कारचालकाविरुद्ध भादंसंचे कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) आणि माेटार वाहन कायद्याचे कलम १८४, १३४ (अ), (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तुळजापूर पाेलीस करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.