A two-wheeler farmer carrying vegetable crushed by truck in Osmanabad | भाजीपाला विक्रीस नेणाऱ्या दुचाकीस्वार शेतकऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले

भाजीपाला विक्रीस नेणाऱ्या दुचाकीस्वार शेतकऱ्यास भरधाव ट्रकने चिरडले

ठळक मुद्देया अपघातात शेतकरी भिमाशंकर सुरवसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

तुळजापूर : भरधाव ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४८ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील बसवंतवाडी पाटीनजीक घडली.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकरी भिमाशंकर रामचंद्र सुरवसे (वय ४८) हे गुरूवारी सकाळी दुचाकीवरून (क्र. एमएच. २५/एएच. ०७२०) अणदूर येथील भाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जात होते. साधारपणे सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी तुळजापूर-नळदुर्ग मार्गावरील बसवंतवाडी पाटीनजीक आली असता, तुळजापूरहून नळदुर्गकडे निघालेल्या भरधाव ट्रकने (क्र. टीएन. ५२/एफ. ८४९३) दुचाकीला जोराची धडक दिली. 

या अपघातात शेतकरी भिमाशंकर सुरवसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तातडीने तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.

Web Title: A two-wheeler farmer carrying vegetable crushed by truck in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.