तुळजापुरात एप्रिलमध्ये दगावले ६५ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:07+5:302021-05-06T04:35:07+5:30

तुळजापूर : पूर्वीच्या तुलनेत काेराेनाची दुसरी लाट तीव्र स्वरूपाची आहे. दिवसागणिक बाधितांच्या संख्येत भर पडत आहे. एप्रिल महिन्यात ही ...

In Tuljapur, 65 patients died in April | तुळजापुरात एप्रिलमध्ये दगावले ६५ रूग्ण

तुळजापुरात एप्रिलमध्ये दगावले ६५ रूग्ण

googlenewsNext

तुळजापूर : पूर्वीच्या तुलनेत काेराेनाची दुसरी लाट तीव्र स्वरूपाची आहे. दिवसागणिक बाधितांच्या संख्येत भर पडत आहे. एप्रिल महिन्यात ही गती अधिक वाढली असून ६५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या १ हजार २०२ वर जावून ठेपली. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

तुळजापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव मे २०२० मध्ये झाला. तेव्हापासून पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत कमी-अधिक प्रमाण वाढ हाेत गेली. मात्र काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक २० ते ३० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. तरीदेखील तुळजापूर शहरासह ग्रामीण भागातील लाेक फारशी काळजी घेताना दिसत नाहीत. परिणामी वर्षभरापूर्वी धडकलेले संकट आजही ठाण मांडून आहे. एप्रिल महिन्यातील स्थिती पाहता प्रतिदिवस ४० ते ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते आहे. दरम्यान सद्य स्थितीत शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड मिळेल का बेड, अशी म्हणण्याची वेळ रुग्ण नातेवाईकांवर आली आहे. त्यामुळे यंत्रणेवरील ताणही वाढला आहे.

चाैकट...

गतवर्षी सप्टेंबर २०२० मध्ये तुळजापूरात उपचार घेणाऱ्या २२ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र एप्रिल २०२१ ने याचे रेकॉर्ड मोडित काढले. या महिन्यात ६५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Web Title: In Tuljapur, 65 patients died in April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.