चोरीच्या सहा मोटारींसह तिघांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:15+5:302021-08-02T04:12:15+5:30

गेल्या वर्षभरापासून या भागात शेतकऱ्याच्या शेतातील मोटारी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, येथील पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांना ...

Three were taken into custody along with six stolen cars | चोरीच्या सहा मोटारींसह तिघांना घेतले ताब्यात

चोरीच्या सहा मोटारींसह तिघांना घेतले ताब्यात

googlenewsNext

गेल्या वर्षभरापासून या भागात शेतकऱ्याच्या शेतातील मोटारी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, येथील पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांना गस्तीदरम्यान वडगाव (काटी) पारधी वस्तीमध्ये विजय भालचंद्र काळे, सागर माणिक पवार व देविदास रामा पवार हे जुने विद्युत पंपविक्री करीत असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली होती. यावरून पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी वरील तिघांना सहा विद्युत मोटारींसह ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अंजुम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन पंडित, उपनिरीक्षक रमेश धुले, गायकवाड, आकाश सूरनूर, सिरसाट यांनी केली.

Web Title: Three were taken into custody along with six stolen cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.