वेतनवाढ राेखलेल्या शिक्षकांची राज्यमंत्र्यांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:33 AM2021-01-25T04:33:24+5:302021-01-25T04:33:24+5:30

शिक्षकांची बदलीप्रक्रिया खूप वेळखाऊ हाेती. तसेच कितीही पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला तरी आराेप-प्रत्याराेप हाेत हाेते. अशा प्रकारांना फाटा देण्यासाठी ...

Teachers with pay hike run to the Minister of State | वेतनवाढ राेखलेल्या शिक्षकांची राज्यमंत्र्यांकडे धाव

वेतनवाढ राेखलेल्या शिक्षकांची राज्यमंत्र्यांकडे धाव

googlenewsNext

शिक्षकांची बदलीप्रक्रिया खूप वेळखाऊ हाेती. तसेच कितीही पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला तरी आराेप-प्रत्याराेप हाेत हाेते. अशा प्रकारांना फाटा देण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने गुरुजींच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला हाेता. पात्र शिक्षकांना आपली माहिती भरण्यासाठी स्वतंत्र पाेर्टलही निर्माण करण्यात आले हाेते. ही पद्धती प्रत्यक्ष २०१८-१९ मध्ये राबविण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात पात्र शिक्षकांना आपली माहिती पाेर्टलवर भरण्यास सांगण्यात आले हाेते. त्यासाठी ठरावीक मुदतही दिली हाेती. त्यानुसार गुरुजींनी माहिती सादर केली. एका क्लिकवर गुरुजींच्या हाती बदल्यांचे आदेश मिळाले. याचवेळी काही गुरुजींनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली. काहींनी पाेर्टलवर चुकीची माहिती भरून लाभ घेतल्याचे त्यांचे म्हणणे हाेते. आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने सुनावण्या घेण्यात आल्या. त्यानुसार आक्षेपात जी सत्यता आढळून आली, त्यांच्याविरुद्ध जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला. अशा गुरुजींची संख्या ५२ एवढी आहे. यांची प्रत्येकी एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, ऑनलाईन माहिती भरताना अनंत अडचणी आल्या. त्यामुळे अर्जात त्रुटी राहिल्या. चुकीची माहिती भरलेली नाही, असा दावा करीत काही गुरुजींनी यापूर्वी विभागीय आयुक्तांकडे सीईओंच्या आदेशाविरूद्ध अपील केले हाेते. परंतु, ही अपिले फेटाळली गेली. त्यामुळे आता संबंधित शिक्षकांनी थेट ग्रामविकास राज्यमंत्र्यांचा दरवाजा ठाेठावला आहे. त्यांच्याकडे अपील करून कारवाई अन्यायकारक असल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे राज्यमंत्री काय भूमिका घेतात? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

चाैकट....

जळगावप्रमाणे चुका क्षमापित करा...

जळगाव ३१ शिक्षकांच्या वेतनवाढी कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या हाेत्या. परंतु, तेथील जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या चुका क्षमापित केल्या व समज देऊन वेतनवाढ बंद केल्याबाबतचा आदेश रद्द केला. याच धर्तीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ शिक्षकांनाही न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आमदारांकडेही पाठपुरावा...

कारवाई झालेल्या ५२ शिक्षकांच्या चुका क्षमापित व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सेनेचे आ. ज्ञानराज चाैगुले, आ. सतीश चव्हाण यांच्याकडे केली आहे.

काेट...

पाेर्टलवर ऑनलाईन माहिती भरताना अनंत अडचणी येत हाेत्या. त्यामुळे काही शिक्षकांच्या चुका झाल्या आहेत. त्या हेतुपूर्वक केलेल्या नाहीत. जळगाव जिल्हा परिषदेने ३१ शिक्षकांवरील कारवाई मागे घेतली आहे. यानुसारच उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ शिक्षकांविरुद्ध केलेली कारवाई रद्द करण्यात यावी, यासाठी राज्यमंत्र्यांकडे अपील केले आहे.

-कल्याण बेताळे,राज्य उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षण समिती.

Web Title: Teachers with pay hike run to the Minister of State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.