सूक्ष्म नियोजन सप्ताहास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:37 AM2021-03-01T04:37:36+5:302021-03-01T04:37:36+5:30

कारी : शेती आधुनिकीकरणासाठी पोखरासारख्या योजनेचा लाभ घेतल्यास शेतीची वाटचाल निश्चित समृद्धीकडे होईल, असा विश्वास आंबेजवळगा गावचे सरपंच आनंद ...

Start the micro planning week | सूक्ष्म नियोजन सप्ताहास प्रारंभ

सूक्ष्म नियोजन सप्ताहास प्रारंभ

googlenewsNext

कारी : शेती आधुनिकीकरणासाठी पोखरासारख्या योजनेचा लाभ घेतल्यास शेतीची वाटचाल निश्चित समृद्धीकडे होईल, असा विश्वास आंबेजवळगा गावचे सरपंच आनंद कुलकर्णी केले. उस्मानाबाद ग्रामीण मंडळ कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या आंबेजवळगा येथे पोखरा योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात निवड करण्यात आलेल्या या गावात लोकसहभागीय सूक्ष्म नियोजनाच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याबाबत जनजागृती करण्यासाठी भजनी मंडळ, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभातफेरी काढण्यात आली. सात दिवस हा लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन प्रक्रिया सप्ताह चालणार असून, यात गावाचा विकास आराखडा बनविण्यात येणार आहे. तसेच शिवारफेरी काढून मृद व जलसंधारणाची कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. गाव जलयुक्त कसे होईल यादृष्टीने कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला जिल्हा प्रकल्प विशेषज्ञ सचिन पांचाळ, कृषी सहाय्यक एम. जी. शेख, समूह सहाय्यक भक्ती भालेराव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Start the micro planning week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.