श्री तुळजाभवानी देवीचा प्रकट दिन पारंपरिक पद्धतीने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:32 AM2021-04-21T04:32:46+5:302021-04-21T04:32:46+5:30

मंगळवारी पहाटे अभिषेक पूजेची घाट होऊन पंचामृत अभिषेक संपन्न झाली. यानंतर महंत व भोपे पुजारी बांधवांनी श्री तुळजाभवानीची नित्योपचार ...

Shri Tulja Bhavani Devi's Revelation Day celebrated in a traditional manner | श्री तुळजाभवानी देवीचा प्रकट दिन पारंपरिक पद्धतीने साजरा

श्री तुळजाभवानी देवीचा प्रकट दिन पारंपरिक पद्धतीने साजरा

googlenewsNext

मंगळवारी पहाटे अभिषेक पूजेची घाट होऊन पंचामृत अभिषेक संपन्न झाली. यानंतर महंत व भोपे पुजारी बांधवांनी श्री तुळजाभवानीची नित्योपचार अलंकार महापूजा मांडली. या महापूजेत दैनंदिन विविध प्रकारच्या अंगार भरजरी वस्त्र व विविध रंगाचे रंगीबेरंगी फुलांचे मोठे हार घालून मस्तकी हिरेजडित टोपावर फुलांचा टोप तयार करून अलंकार पूजा मांडली होती. यानंतर श्री तुळजाभवानीची आरती, नैवेद्य, धुपारती व अंगारा हे विविध धार्मिक विधी आई राजा उदे-उदेच्या गजरात पार पडले. यानंतर दुपारी तुळजाभवानीला सेवेकरी पलंगे यांनी पंख्याने वारा घालत सेवा केली. दरम्यान, भोपे पुजारी यांनी तुळजाभवानीस विशेष नैवेद्य दाखवून थंड शरबत दिले. सद्यस्थितीत कोविड महामारीमुळे मंदिर बंद आहे. यामुळे महंत, मोजके भोपे पुजारी, सेवेकरी व मंदिर कर्मचारी यांच्या उपस्थितीत तुळजाभवानीचा प्रकट दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरवासीयांनी व देवी भाविकांनी महाद्वारातून शिखर दर्शन घेऊन प्रकट दिन साजरा केला.

Web Title: Shri Tulja Bhavani Devi's Revelation Day celebrated in a traditional manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.