उडान अंतर्गत महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:36+5:302021-03-05T04:32:36+5:30

परंडा : तालुक्यातील अनाळा येथे उडाण प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली असून, प्रभागांतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रभाग ...

Selection of female office bearers under flight | उडान अंतर्गत महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी

उडान अंतर्गत महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी

googlenewsNext

परंडा : तालुक्यातील अनाळा येथे उडाण प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली असून, प्रभागांतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रभाग संघ पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

यामध्ये प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी आंदोरी येथील रोहिणी धनाजी बारसकर, सचिवपदी कार्ला येथील भागीरथी नामदेव झिरपे, कोषाध्यक्षपदी पिस्तमवाडी येथील रेश्मा अण्णा चव्हाण तर लिपिक म्हणून पिंपरखेड येथील मोनिका भारत कोळी यांची निवड करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आंबिका क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी सावंत उपस्थित होते. यावेळी शाखाधिकारी सावंत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. उमेद अंतर्गत येणाऱ्या स्वयंसाहाय्यता समूहाने मदत करून येणाऱ्या अडचणी दूर करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

तालुका अभियान व्यवस्थापक माणिक सोनटक्के, प्रभाग संंघ बांधणी निरीक्षक नाईक, प्रभाग समन्वयिका प्रिया पाटील, प्रभाग समन्वयक माळी, चांदणे, आशा स्वयंसेेविका अनिता क्षीरसागर, प्रभागातील अनाळा, रोहकल, कंडारी, कार्ला, साकत, पाचपिंपळा, राजुरी, कुुंभेफळ, खासापुरी, मलकापूर, पिस्तमवाडी, आंदोरा आदी गावातील ग्रामसंघाच्या महिला यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी समन्वयक प्रिया पाटील, प्रेरिका नौशाद शेख यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Selection of female office bearers under flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.