मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात

By मोरेश्वर येरम | Published: January 17, 2021 05:18 PM2021-01-17T17:18:00+5:302021-01-17T17:20:10+5:30

उद्या (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. 

recruitment of 8500 posts in the health department in the state advertisement will be issued tomorrow says health minister rajesh tope | मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात

मोठी घोषणा! राज्यात आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्या निघणार जाहीरात

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणाराज्याच्या आरोग्य विभागात एकूण १७ हजार पदांची भरतीपहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरती, उद्याच प्रसिद्ध होणार जाहीरात

राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरती संदर्भातील मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून लवकरच  एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरतीची जाहिरात उद्याच प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

"कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला होता. आरोग्य यंत्रणेवरील सध्याचा ताण लक्षात घेता येत्या काळात एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे", असं राजेश टोपे म्हणाले. 
उद्या (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं. 

कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्यांचं काय?
कोरोना काळात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं नोकरीचं कंत्राट संपलं असलं तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरतीवेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. 

दोन टप्प्यात नोकर भरती
आरोग्य विभागात एकूण १७ हजार पदांची भरती करण्यात येणार असून यात पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील भरती ही ग्रामविकास विभागाशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आहे. या भरतीत क आणि ड वर्गातील पदं भरली जाणार आहेत. यात नर्सेस, वॉर्ड बॉय, क्लर्क आणि टेक्निशियनचा समावेश असणार आहे. 
 

Web Title: recruitment of 8500 posts in the health department in the state advertisement will be issued tomorrow says health minister rajesh tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.