ईट येथील जुगार अड्ड्यावर छापा, दाेन लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:30 AM2021-03-06T04:30:58+5:302021-03-06T04:30:58+5:30

वाशी : भूम तालुक्यातील ईट येथील जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी ४ मार्चच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत ...

Raid on a gambling den at Eat, seizure of Rs | ईट येथील जुगार अड्ड्यावर छापा, दाेन लाखांचा ऐवज जप्त

ईट येथील जुगार अड्ड्यावर छापा, दाेन लाखांचा ऐवज जप्त

googlenewsNext

वाशी : भूम तालुक्यातील ईट येथील जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी ४ मार्चच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत सुमारे २८ जणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून राेख ३२ हजार, जुगाराचे साहित्य, ६ दुचाकी असा एकूण १ लाख ९७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पाेलिसांच्या या कारवाईमुळे जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

भूम तालुक्यातील ईट येथे बस थांब्याच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्याचा जुगार चालत असल्याची माहिती भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.विशाल खांबे व पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना मिळाली हाेती. यानंतर लागलीच पोलीस फौजफाटा जमवून हे पथक गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ईटमध्ये धडकले. जुगाऱ्यांना सुगावा लागण्याच्या आतच पथकाने छापा टाकला. यावेळी पाेलिसांनी राेख ३२ हजार व ६ दुचाकी जप्त केल्या, तसेच थाेडेथाेडके नव्हे, तर तब्बल २८ जणांना रंगेहात पकडले. यात अनिल नवनाथ हुंबे, अनिल प्रल्हाद हुंबे, अक्षय संभाजी देशमुख, आमोल दिलीप सासवडे, दादासाहेब विक्रम थोरात, आश्रु दादासाहेब थोरात, आप्पा सूर्यभान आवारे, महादेव रंगनाथ थोरात, सदानंद सुरेश आसलकर, नाना विठ्ठल गायकवाड, पवन बबन थोरात, जयसिंग राजेंद्र शिंदे, भाऊसाहेब विठ्ठल गायकवाड, सुरेश श्रीराम गीते, रोहन माणिक थोरात, रमेश तुकाराम गायकवाड, बाबासाहेब लक्ष्मण डंबरे, रोहन रमेश भोसले, अमर सतीश आसलकर, सुभाष भाऊराव देशमुख, नीलकंठ महादेव नलावडे, गणपती बारीकराव काटे, अनिल तुकाराम गायकवाड, दस्तगीर चंदुलाल पठाण, कासम आब्बास आतार, अनिल रूपचंद थोरात, राजेंद्र नरहारी देशमुख, बाजीराव राजेंद्र भोसले यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. तपास जमादार गोरख टकले हे करीत आहेत.

Web Title: Raid on a gambling den at Eat, seizure of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.