महिला आत्महत्या प्रकरणात पाेलीस कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:32 AM2021-03-05T04:32:38+5:302021-03-05T04:32:38+5:30

उस्मानाबाद : शहरातील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली हाेती. उस्मानाबाद पोलीस दलातील एका ...

Paelis staff suspended in female suicide case | महिला आत्महत्या प्रकरणात पाेलीस कर्मचारी निलंबित

महिला आत्महत्या प्रकरणात पाेलीस कर्मचारी निलंबित

googlenewsNext

उस्मानाबाद : शहरातील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली हाेती. उस्मानाबाद पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केल्याने या महिलेने आत्महत्या केल्याची तक्रार देण्यात आल्याने त्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला हाेता. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास अटक करून पाेलीस अधीक्षक राज तिलक राैशन यांनी गुरुवारी निलंबनाची कारवाई केली. तसेच विभागीय चाैकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील एका ३२ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली हाेती. दरम्यान, मृत्यूपूर्वी या महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने वेळोवेळी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले होते. मयत महिलेच्या पतीने रात्री उशिरा याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीवर लैंगिक अत्याचार व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा झाला आहे. गुन्हा दाखल हाेताच पाेलीस कर्मचारी हरिभाऊ भास्कर काेळेकर यास अटक करण्यात आली. घटनेची गंभीर दखल घेत पाेलीस अधीक्षक राज तिलक राैशन यांनी काेळेकर याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली. तसेच विभागीय चाैकशीही प्रस्तावित केली आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी माेतीराम राठाेड हे करीत आहेत.

Web Title: Paelis staff suspended in female suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.