पाेलीस पाटलांना मारहाण झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:30 AM2021-03-06T04:30:51+5:302021-03-06T04:30:51+5:30

पोलीस पाटील संघटनाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ डिसेंबर, २०२० रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात ...

Non-bailable offense in case of beating of Paelis Patel | पाेलीस पाटलांना मारहाण झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

पाेलीस पाटलांना मारहाण झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

googlenewsNext

पोलीस पाटील संघटनाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ डिसेंबर, २०२० रोजी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीला गाव कामगार पोलीस पाटील संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. बहुतांश विषय मार्गी लावण्याचे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दिले. पोलीस पाटील हा शासनाचा शेवटचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर कार्यरत असतो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. अशा परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्यास, संबंधितांविरुद्ध भादंसंचे कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश गृहविभागाचे पोलीस महासंचालक यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना ३ मार्च रोजी दिले आहेत. या निर्णयामुळे पोलीस पाटील यांनी समाधान व्यक्त करून या निर्णयाचे गाव कामगार पोलीस पाटील संघाचे प्रदेश संघटक दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, जिल्हा सरचिटणीस धनंजय गुंड, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील यांनी काैतुक केले.

Web Title: Non-bailable offense in case of beating of Paelis Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.