ओमराजेंच्या विजयात ‘नमो’ फॅक्टर महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:42 PM2019-05-25T17:42:25+5:302019-05-25T17:46:03+5:30

शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्याचा राष्ट्रवादीचा ‘गेमप्लान’ यावेळीही अयशस्वी

Namo factor plays important role in Omraje Nibalkar's lok sabha victory in Osmanabad | ओमराजेंच्या विजयात ‘नमो’ फॅक्टर महत्त्वाचा

ओमराजेंच्या विजयात ‘नमो’ फॅक्टर महत्त्वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचा ९८ हजार मते घेत राष्ट्रवादीला धक्का प्रा़रवी गायकवाड यांचा पत्ता कापून ओम राजेनिंबाळकरांची उमेदवारी

- चेतन धनुरे
लोकसभेच्या मैदानात शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्याचा राष्ट्रवादीचा ‘गेमप्लान’ यावेळीही अयशस्वी ठरला आहे़ सेनेने खासदार प्रा़रवी गायकवाड यांचा पत्ता कापून ओम राजेनिंबाळकरांची घेतलेली ‘रिस्क’ यशस्वी ठरली़सव्वा लाखांच्या फरकाने त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आ़राणाजगजितसिंह पाटील यांना मात दिली़ ओमराजेंच्या या विजयात ‘नमो’ फॅक्टर चांगलाच चालला़

उस्मानाबाद लोकसभेसाठी शिवसेनेकडून ओम राजेनिंबाळकर तर राष्ट्रवादीकडून आ़ राणाजगजितसिंह पाटील हे दोघे चुुलतभाऊच आमनेसामने उभे होते़ दोन वेळा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटून झाल्यानंतर यावेळी पुन्हा हे दोघे लोकसभेच्या आखाड्यात उतरले़ विद्यमान खासदार रवी गायकवाड यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांचा रोष पत्करून राजेनिंबाळकर मैदानात उतरले होते़ अखेरच्या टप्प्यात तर खासदारांनी बदनामीचा गुन्हा दाखल करून ओमराजेंविरुद्ध उघड प्रचार केला़ मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले़ 
खासदार गायकवाड यांच्या होमपिचवरच (उमरगा) सेनेने जोरदार आघाडी घेतली़ मित्रपक्षांना सोबतीला घेऊन मोदी व केंद्र सरकारच्या कामगिरीवर सेना मतदारांना सामोरे गेली़ त्याला यश येऊन सेनेने हा गड पुन्हा जवळपास सव्वा लाखांच्या फरकाने जिंकला आहे़

काँग्रेस-राष्ट्रवादी  एकदिलाने लढले
आतापर्यंतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी कट्टर शत्रुत्व निभावणारी काँग्रेस यावेळी एकदिलाने मदतीला समोर आली होती़ राणा पाटील यांची छबी, राष्ट्रवादीचे अन् सोबतीला मित्रपक्षांचे बळ, शिस्तबद्ध प्रचार या जोरावर राणा पाटील यांना विजयाचा आत्मविश्वास होता़ मात्र, सव्वालाखाहून अधिक संख्येने वाढलेले नवमतदार आपल्याकडे वळविण्यात त्यांना यश आले नाही़ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनीही तब्बल ९८ हजार ५७९ मते घेत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे़ पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांना आघाडी मिळत गेली़ ती अखेरपर्यंत कायम राहिली़ 

स्कोअर बोर्ड
ओम राजेनिंबाळकर यांना ५ लाख ९६ हजार ६४०, तर राणा पाटील यांना ४ लाख ६९ हजार ७४ मते मिळाली. राजेनिंबाळकर १ लाख २७ हजार ५६६ मतांनी विजयी झाले. मागच्याप्रमाणेच उस्मानाबाद, परंडा, उमरगा, तुळजापूर, बार्शी, औसा युतीच्या पाठीशी राहिले.

Web Title: Namo factor plays important role in Omraje Nibalkar's lok sabha victory in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.