बंदुकीसाठी झाला खून..? राजस्थानी तरुणाच्या खुनाचा पोलिसांनी दोन तासात लावला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 05:51 PM2021-03-25T17:51:37+5:302021-03-25T17:54:16+5:30

Rajasthani youth murder case in Tulajapur बंदूकही मिळत नव्हती अन् पैसेही. त्यामुळे आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने वार करून बलवीरचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Murder for a gun ..? Police solve Rajasthani youth murder case in two hours | बंदुकीसाठी झाला खून..? राजस्थानी तरुणाच्या खुनाचा पोलिसांनी दोन तासात लावला छडा

बंदुकीसाठी झाला खून..? राजस्थानी तरुणाच्या खुनाचा पोलिसांनी दोन तासात लावला छडा

googlenewsNext
ठळक मुद्देफरशी कामगार बलवीर मेगनलाल वर्मा (२२) हा मागील तीन वर्षांपासून तुळजापूर येथे काम करत होता. मृतदेह बुधवारी सकाळी आपसिंगा रोडवरील मोतीझरा तांडा येथील एका शेतात आढळला.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या एका राजस्थानी तरुणाचा तुळजापुरात खून झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून अवघ्या दोन तासांतच तुळजापुरातीलच दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. आणखी एक संशयित घटनेनंतर फरार झाला.

फरशी कामगार बलवीर मेगनलाल वर्मा (२२) हा मागील तीन वर्षांपासून तुळजापूर येथे काम करत होता. त्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आपसिंगा रोडवरील मोतीझरा तांडा येथील एका शेतात आढळला. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. दिलीप टिपरसे, सहायक निरीक्षक सुशीलकुमार चव्हाण, उपनिरीक्षक विकास दांडे, राहुल रोटे, चनशेट्टी, कर्मचारी एस.एम. गायकवाड, आर. बी. पठाण, संदीप भुतेकर, कल्याण पवार, महेश चौरे, सचिन राऊत, अजय सोनवणे, अमोल बनसोडे, अमोल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेत असतानाच पोलिसांना उस्मानाबाद रोडवरील एका बारमध्ये बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोन युवक रक्ताने माखलेल्या कपड्यावर आले होते, असे कळाले. तातडीने तिकडे धाव घेऊन पोलिसांनी त्या तरुणांचे वर्णन मिळविले व त्याआधारे वेताळनगर भागातून सिद्धार्थ अरुण गायकवाड यास संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती घेत राजू सावंत या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले तर आणखी एक संशयित शुभम जाधव हा फरार झाला.

प्लुटोने पटविली आरोपीची ओळख...
घटनास्थळावर श्वानपथकासह पोलीस इन्व्हेस्टिगेशन व्हॅन, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासही पाचारण करण्यात आले होते. यावेळी मृतदेहापासून ५० मीटर अंतरावर दारूची बाटली सापडली. श्वानपथकातील भारत मस्के व स्वप्निल ढोणे यांनी दारूच्या बाटलीच्या झाकणाचा वास देऊन संशयित ७ तरुणांना समोर उभे केले तेव्हा प्लुटोने थेट सिद्धार्थ गायकवाड या तरुणावर उडी घेतली. पुढील तपासात शहरातीलच एका हार्डवेअर दुकानात काम करणाऱ्या राजू सावंत याला ताब्यात घेण्यात आले.

बंदुकीसाठी झाला खून..?
मृत बलवीर वर्मा याने आरोपींकडून १५ हजार रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्याने राजस्थानातून बंदूक आणून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, बंदूकही मिळत नव्हती अन् पैसेही. त्यामुळे आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने वार करून बलवीरचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Web Title: Murder for a gun ..? Police solve Rajasthani youth murder case in two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.