मेधा पाटकर या परकीय एजंट; केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:17 PM2019-01-25T16:17:01+5:302019-01-25T16:17:43+5:30

देशाची विकास कामे थांबविण्यासाठी मेधा पाटकर यांना आर्थिक मदत दिली जाते.

Medha Patkar is foreign agent; Critical allegations of Union Agriculture state Minister | मेधा पाटकर या परकीय एजंट; केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

मेधा पाटकर या परकीय एजंट; केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

googlenewsNext

उस्मानाबाद : मेधा पाटकरांना परकीय आर्थिक मदत मिळत असून त्या जोरावरच परकीय शक्तींकडून देशाची विकासकामे रोखण्यात येत असल्याचा खळबळजणक आरोप कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपालांनी केला आहे. 


एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. मेधा पाटकर ही एकटीच महिला एवढ्या ताकदीने लोकांना गोळा करते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही महिला कशी विरोध करू शकते, यावर संशय आला होता. यामुळे त्यांच्याविरोधात केंद्र सरकारकडून चौकशी सुरु असल्याचा आरोप पुरुषोत्तम रुपालांनी केला. 




नर्मदा आंदोलनासाठी पाटकरांना परदेशातून पैसे येतात. त्यांच्या सारख्या विरोधकांना देशाची विकास कामे थांबविण्यासाठी ही मदत दिली जाते. या परदेशी ताकदींची नावे नसतात, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Medha Patkar is foreign agent; Critical allegations of Union Agriculture state Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.