'जितकी मतं तितकी झाडं', नवनिर्वाचित खासदाराचा पर्यावरणदिनी संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 05:33 PM2019-06-06T17:33:39+5:302019-06-06T17:39:02+5:30

पर्यावरणातील बदल आणि जागतिक तापमानवाढ ही सर्वात मोठी समस्या बनली आहे.

'As many trees as possible', the eco-friendly resolution of the newly elected MP omraje nimbalkar | 'जितकी मतं तितकी झाडं', नवनिर्वाचित खासदाराचा पर्यावरणदिनी संकल्प

'जितकी मतं तितकी झाडं', नवनिर्वाचित खासदाराचा पर्यावरणदिनी संकल्प

googlenewsNext

उस्मानाबाद - शिवसेना नेते आणि उस्मानाबादचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पर्यावरणदिनी झाडे लावण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत मला जेवढी मते मिळाली, तेवढी झाडे मी लावणार असल्याचे ओमराजे यांनी म्हटले आहे. तसेच माझ्याप्रमाणे देशातील सर्वच नवनिर्वाचित खासदारांनी असा संकल्प केल्यास देशात पर्यावरणपूरक स्थिती निर्माण होऊन चांगले पर्जन्यमान होईल, असेही ओमराजे यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर ओमराजे निंबाळकर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ओमराजे यांनी महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे नेते राणा जगजीतसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. त्यानंतर दिल्लीतील संसद भवन येथून परतल्यानंतर पहिल्यांदाच ओमराजे यांनी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेत असल्याचे सांगितले. 

पर्यावरणातील बदल आणि जागतिक तापमानवाढ ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे पर्यावरणूपरक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. मी उस्मानाबाद या दुष्काळी भागातील जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो. मला लोकसभा निवडणुकीत 5 लाख 91 हजार 705 मतांचे आशीर्वाद जनतेनं दिले आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मी जितकी मते तितकी झाडे हा संकल्प राबवत आहे. त्यानुसार, मतदारसंघात 6 लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेत असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. लवकरच पावसाळ्याला सुरुवात होताच, ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करणार असल्याचेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. आपल्या फेसबुक पेजवरून ओमराजे यांनी एका व्हिडीओद्वारे ही माहिती दिली.     
 

 

Web Title: 'As many trees as possible', the eco-friendly resolution of the newly elected MP omraje nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.