जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायतींमध्ये येणार महिला राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:32 AM2021-01-20T04:32:38+5:302021-01-20T04:32:38+5:30

उस्मानाबाद : जिल्हाभरातील सुमारे ६२२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ३२० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सूत्रे महिलांच्या ...

Mahila Raj will come in 320 gram panchayats in the district | जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायतींमध्ये येणार महिला राज

जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायतींमध्ये येणार महिला राज

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हाभरातील सुमारे ६२२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ३२० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सूत्रे महिलांच्या हाती येणार आहेत.

जिल्हाभरातील ३८२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान झाले हाेते. १८ जानेवारी राेजी निकाल जाहीर झाला असता, आता ग्रापंचायतनिहाय सरपंच पदाच्या आरक्षणाकडे गाव कारभाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी तालुकानिहाय जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींचे वेगवेगळे प्रवर्ग व महिला सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी ५३, अनुसूचित जमाती महिलांसाठी ९, ओबीसी महिलांसाठी ८६, तर खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता १७२ ग्रामपंचायती निश्चित केल्या आहेत. उपराेक्त आकडेवारी पाहता, जिल्हाभरातील सुमारे ३२० ग्रामपंचायतींत महिलाराज अवतरणार आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील सर्वसाधारण गटासाठी ४८, अनुसूचित जमातीतील सर्वसाधारण गटासाठी ५, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण गट प्रवर्गासाठी ८२, तर खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी १६७ सरपंचाची पदे असतील.

पाॅईंटर...

उस्मानाबाद तालुक्यातील अनुसूचित जातीतील सर्वसाधारण गटासाठी नऊ, महिलांसाठी दहा, अनुसूचित जमातीतील सर्वसाधारण गटासाठी दोन, तर महिलांसाठी दोन, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण गट आणि महिलांसाठी प्रत्येकी १५, खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गट आणि महिलांसाठी प्रत्येकी २९ असे सरपंच पदाचे आरक्षण असेल.

तुळजापूर - तालुक्यातील एकूण १००८ सरपंच पदांपैकी अनुसूचित जातीतील सर्वसाधारण गटासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी ९,अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी १, नागारिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी १४, तर महिलांसाठी १५, खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी ३० असे सरपंच पदाचे आरक्षण असेल.

उमरगा - तालुक्यातील एकूण ८० सरपंचपदांपैकी अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण गटासाठी ६, तर महिलासाठी ७, अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण गटासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी १, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीच्या सर्वसाधारण गटासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी ११, खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी २१, तर महिलांसाठी २२ सरपंच पदाचे आरक्षण असेल.

लोहारा - तालुक्यातील एकूण सरपंचपदापैकी अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण आणि महिलांसाठी प्रत्येकी चार, महिलांसाठी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी व महिलांसाठी प्रत्येकी सहा, खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी अकरा, तर महिलांसाठी बारा सरपंच पदाचे आरक्षण असेल.

कळंब -तालुक्यातील एकूण ९१ सरपंचपदांपैकी अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी आठ, तर महिलांसाठी नऊ, अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण आणि महिलांसाठी प्रत्येकी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण गटांसाठी बारा, तर महिलांसाठी तेरा, खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी २३, तर महिलांसाठी २४ सरपंच पदे आरक्षित असतील.

भूम- तालुक्यातील एकूण ७४ सरपंच पदांपैकी अनुसूचित जातीतील सर्वसाधारण गटासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी पाच, अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण गटासाठी निरंक, तर महिलांसाठी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी आणि महिलासाठी प्रत्येकी दहा, तर खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी, २१ तर महिलांसाठी २२ सरपंच पदाचे आरक्षण असेल.

परंडा- तालुक्यातील एकूण ७२ सरपंचपदांपैकी अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी चार, तर महिलांसाठी पाच, महिलांसाठी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी नऊ व महिलासाठी दहा, खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी २१ व महिलांसाठी २२ सरपंच पदांचे आरक्षण असेल.

वाशी- तालुक्यातील एकूण ४२ सरपंचपदांपैकी अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी तीन, तर महिलांसाठी चार, अनुसूचित जमातीच्या सर्वसाधारण गटासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी पाच, तर महिलासाठी सहा, खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटासाठी आणि महिलांसाठी प्रत्येकी अकरा सरपंच पदांचे आरक्षण असेल.

Web Title: Mahila Raj will come in 320 gram panchayats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.