टेस्टिंग सेंटरला स्थानिकांतून हाेताेय विराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:09+5:302021-05-06T04:35:09+5:30

कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात मागच्या वर्षभरापासून कोरोनाची रॅपिड आणि आरटीपीसीआर तपासणी होते. यानंतर याच ठिकाणी कोरोना बाधित गंभीर रूग्णावंर ...

Local opposition to the testing center | टेस्टिंग सेंटरला स्थानिकांतून हाेताेय विराेध

टेस्टिंग सेंटरला स्थानिकांतून हाेताेय विराेध

googlenewsNext

कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात मागच्या वर्षभरापासून कोरोनाची रॅपिड आणि आरटीपीसीआर तपासणी होते. यानंतर याच ठिकाणी कोरोना बाधित गंभीर रूग्णावंर उपचार करणारे काही बेड कार्यान्वित आले. तद्नंतर लस उपलब्ध झाल्यावर लसीकरणाचे सेशन्सही याठिकाणी होवू लागले.

या सर्व कारणांमुळे उपजिल्हा रुग्णालय परिसर सातत्याने गर्दीने फुललेला असयाचा. यात कोण बाधित अन् कोण ठिकठाक? याचा ताळमेळ लागत नव्हता. यामुळे संसर्गाचा धोका अधिकच वाढला होता. परिणामी प्रशासनाने कोरोना टेस्टींग सेंटर पुनर्वसन सावरगाव भागातील नगर परिषद शाळेत हलविण्याचा निर्णय घेतला होता.

यानुसार मागच्या काही दिवसांपासून सावरगाव भागातील मारूती मंदिराजवळ कोरोना टेस्ट होत होत्या. आता यासही स्थानिक भागातून विरोध होवू लागला आहे. सावरगाव व गांधीनगर भागातील काही नागरिकांनी यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाला निवेदन देवून टेस्टींग सेंटरला विरोध दर्शवला आहे. हे सेंटर पालिकेच्या इमारतीत सुरू करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

चौकट...

भरवस्तीत केंद्र नको...

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात सावरगाव भागातील पालिका शाळेतील कोरोना तपासणी केंद्राच्या आसपास वस्ती आहे. याठिकाणी सकाळपासूनच रूग्णांची ये-जा असते. यामुळे आमच्या भागातून हे केंद्र हलवा, अ‌शी मागणी करण्यात आली आहे. यावर विकास कदम, लखन गायकवाड, प्रमोद समुद्रे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Local opposition to the testing center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.