केश कर्तनाचे पैसे मागितल्यावरून चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:37 AM2021-03-01T04:37:32+5:302021-03-01T04:37:32+5:30

उस्मानाबाद : केश कर्तनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाच्या डाेक्यात चाकूने वार करून दुचाकीचेही नुकसान केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा ...

Knife attack for asking for haircut | केश कर्तनाचे पैसे मागितल्यावरून चाकूहल्ला

केश कर्तनाचे पैसे मागितल्यावरून चाकूहल्ला

googlenewsNext

उस्मानाबाद : केश कर्तनाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाच्या डाेक्यात चाकूने वार करून दुचाकीचेही नुकसान केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे घडली. याप्रकरणी तामलवाडी पाेलीस ठाण्यात २७ फेब्रुवारी राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, माळुंब्रा येथील रमेश व नंदकुमार रमेश वाघमारे हे पिता-पुत्र २६ फेब्रुवारी राेजी गावातील आपल्या केश कर्तनालयाच्या दुकानात हाेते. यावेळी नमूद पिता-पुत्रांनी गावातीलच शुभम दत्तात्रय वडणे यांना केश कर्तनाचे पैसे मागितले. यामुळे चिडलेल्या शुभमने दाेघांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शुभमचा मित्र सचिन शशिकांत कुटार याने नंदकुमार यांच्या डाेक्यात बतईने वार केला. तसेच दुकानासमाेरील दुचाकीवर दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी नंदकुमार वाघमारे यांनी २७ फेब्रुवारी राेजी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरून संबंधितांविरुद्ध तामलवाडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Knife attack for asking for haircut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.