लस घेतल्यानंतरही उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 04:28 PM2021-02-21T16:28:56+5:302021-02-21T16:29:37+5:30

मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्ये वाढ हाेत असतानाच आता जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर हेही काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत.

kaustubh diwegaonkar covid positive even after vaccination | लस घेतल्यानंतरही उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह

लस घेतल्यानंतरही उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्ये वाढ हाेत असतानाच आता जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर (kaustubh diwegaonkar ) हेही काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काेराेना लसीचा पहिला डाेस घेऊनही संसर्ग झाला असल्याने अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. त्यामुळे आता सर्वांनीच शासन तसेच प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सूचनांचे तंताेतंत पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे. (kaustubh diwegaonkar covid positive even after vaccination)

काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर जिल्ह्यातील विविध सेवा, साेयी-सुविधा पूर्वत सुरू करण्यात आल्या. परंतु, मध्यंतरीच्या काळात नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सरकारकडून करण्यात आलेल्या सूचनांना फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच की काय, काेराेना बाधितांची संख्या पाच ते सहा वरून आता प्रतिदिन २० ते २५ वर जावून ठेपली आहे. सर्वसामान्यांसाेबतच महत्वाच्या जिल्ह्यातील अनेक व्यक्तींना संसर्ग झाला आहे. यापैकीच जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांचाही अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे. जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन ते सध्या घरामध्येच विलगीकरणात आहेत. तिथूनच ते कार्यालयीन काम करीत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी काेराेना लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतरही लागण झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अकारण घराबाहेर न पडता प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करावे. थाेडीबहुत लक्षणे आढळून आली तरी ती अंगावर न काढता तातडीने चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दिवेगाकवर यांच्या पत्नी प्रियंका बाेकील यांनाही काेराेनाचा संसर्ग झाला आहे.

"मागील काही दिवसांपासून शासकीय कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. परंतु, माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे ‘नो मास्क,नो एन्ट्री’ आवश्यक आहे. मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मात्र, कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत"
-काैस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

Web Title: kaustubh diwegaonkar covid positive even after vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.