'कर्ज फेडले नाही तर उचलून नेऊ'; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 02:52 PM2020-08-10T14:52:25+5:302020-08-10T14:57:10+5:30

भूम तालुक्यातील अंतरगाव येथील सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते

'If the debt is not repaid, we will kidnap you'; Filed a case against the lender for inciting suicide | 'कर्ज फेडले नाही तर उचलून नेऊ'; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

'कर्ज फेडले नाही तर उचलून नेऊ'; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे ५ ऑगस्ट रोजी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या दोघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा

परंडा (जि़ उस्मानाबाद) : सावकाराच्या त्रासाला कंटाळून  सुरेश सावता माळी-बनसोडे  (५0) या व्यक्तीने शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना भूम तालुक्यातील अंतरगाव येथे ५ आॅगस्ट रोजी घडली़ याप्रकरणी ८ आॅगस्ट परंडा पोलीस ठाण्यात सावकाराविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

भूम तालुक्यातील अंतरगाव येथील सुरेश माळी-बनसोडे यांनी काही महिन्यांपूर्वी जवळा (नि़) येथील भारत गवारे यांच्याकडून व्याजाने कर्ज घेतले. कर्ज वसूलीसाठी भारत गवारे व त्यांची सहकारी आशाबाई हे दोघे सुरेश माळी यांना उचलून नेण्याची धमकी प्रत्यक्ष तसेच मोबाईल फोनद्वारे देत होते़ त्यांच्या या त्रासास कंटाळूनच सुरेश माळी यांनी ५ ऑगस्ट रोजी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली़  या प्रकरणी मयत सुरेश माळी यांचा मुलगा सुजीत माळी यांनी परंडा पोलीस ठाण्यात ८ ऑगस्ट रोजी फिर्याद दाखल केली. त्यावरुन उपरोक्त दोघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: 'If the debt is not repaid, we will kidnap you'; Filed a case against the lender for inciting suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.