शिवजन्मोत्सवानिमित्त कर्तृत्ववान गावकऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:02 AM2021-02-28T05:02:40+5:302021-02-28T05:02:40+5:30

कळंब : तालुक्यातील वाकडी (के.) येथे शिवजन्मोत्सवानिमित्त शिवक्रांती विचारमंचाच्या वतीने विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या गावकऱ्यांना पुरस्कार देऊन ...

Honoring the able-bodied villagers on the occasion of Shivjanmotsavani | शिवजन्मोत्सवानिमित्त कर्तृत्ववान गावकऱ्यांचा सन्मान

शिवजन्मोत्सवानिमित्त कर्तृत्ववान गावकऱ्यांचा सन्मान

googlenewsNext

कळंब : तालुक्यातील वाकडी (के.) येथे शिवजन्मोत्सवानिमित्त शिवक्रांती विचारमंचाच्या वतीने विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या गावकऱ्यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी नागनाथ जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, जलमंदिर प्रतिष्ठानचे अजित काळे, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार, प्रा. जगदीश गवळी, तुषार वाघमारे, सागर बाराते, श्रुती जाधव, पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे, अशोक शिंदे, सरपंच परिमळा कोल्हे, उपसरपंच तुकाराम कुरुंद, बालाजी कोल्हे, बालाजी फाटे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत कर्तृत्व सिध्द करणाऱ्या सुपुत्रांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात दत्तात्रय जंगल कोल्हे, तुकाराम कोल्हे, संदीप वाघमारे (यशस्वी उद्योजक), मनिषा लक्ष्‍मण कांबळे (हिरकणी पुरस्कार), सोनिया कुरुंद, संगीता कुरुंद, ज्योती शिंदे, ज्योती रणदिवे (राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती रमाई पुरस्कार), शारदा भागवत घोळवे (उत्कृष्ट मुख्याध्यापिका), अतुल कोल्हे (शिवकार्य पुरस्कार), बाबासाहेब रणदिवे (उत्कृष्ट सेवा पुरस्कार) यांचा समावेश आहे. यावेळी शरद गोरे, प्रा. तुषार वाघमारे, श्रुती जाधव यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवक्रांती विचारमंचचे अशोक कुरुंद यांनी केले. कार्यक्रमासाठी गणेश रसाळ, निखिल कुरुंद, विशाल कोल्हे, योगेश वाघमारे, सचिन वाघमारे, अनिकेत कोळी, प्रणव कुरुंद, आनंद रणदिवे, शैलेश रणदिवे, विकी रणदिवे, तानाजी कुरुंद, महेश कोल्हे, सचिन कोल्हे, किरण वाघमारे, ऋषिकेश कोल्हे, राहुल कुरुंद आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Honoring the able-bodied villagers on the occasion of Shivjanmotsavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.